Central Bank Of India Apprentice Bharti 2024: नमस्कार मित्रांनो बँकिंग क्षेत्रातल्या एक अग्रगण्य असणारी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँक केंद्र सरकार च्या अधिपत्याखाली काम करत असून त्यानुसार ही बँक रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या अंडर काम करते अशा या सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती होणार आहे तरी या भरतीची माहिती ही सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावयाचा आहे
Table of Contents
Central Bank Of India Apprentice Bharti 2024
भरतीचे नाव :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणार भरती
पदाचे नाव :- अप्रेंटिसशिप / शिकाऊ उमेदवार
एकूण पदसंख्या :- या पद भरतीसाठी जवळपास 3,000 हून अधिक जागांची भरती होणार आहे
शैक्षणिक अर्हता :- या पदाच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतील पदवी किंवा पदवीधर चे शिक्षण पूर्ण केलेले असावे त्याच्याकडे त्याबद्दलचे प्रमाणपत्र असावे
नोकरी ठिकाण :- पदाच्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड करण्यात येईल त्या उमेदवाराला संपूर्ण भारत मध्ये कुठेही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे
वयोमर्यादा :- या पदभरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा ही काही विशिष्ट ठेवण्यात आलेले आहे ती वयोमर्यादा म्हणजे उमेदवाराचे वय कमीत कमी 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असावे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात
अर्ज करण्याची पद्धत :- या पदभरतीसाठी उमेदवाराला हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख :- या पदावरती साठी अर्ज हे 17 जून 2024 पर्यंत स्वीकारण्यात येईल
अधिकृत संकेतस्थळ :- https://centralbankofindia.co.in/en
Application Fee
अर्ज फी
या पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क आकारण्यात आले आहे ते अर्ज शुल्क हे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळे आहेत त्याची सर्व माहिती आपणास खाली मिळणार आहे
या भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी अर्ज फी ही 800/-रुपये+ GST एवढी आहे
आणि दुसऱ्या कॅटेगरीसाठी त्यामध्ये SC / ST आणि महिला यांसाठी अर्ज फी एवढी आहे600/- रुपये + GST
या भरतीसाठी जे उमेदवार PWD मधून अर्ज सादर करणार आहे अशा उमेदवारांना अर्ज फी एकदम कमी म्हणजे 400/- रुपये + GST एवढी आहे
त्यामुळे उमेदवारांनी आपापल्या कॅटेगरीनुसार फी भरायची आहे
Pay Scale
मासिक वेतन
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या अप्रेंटीशीप या पदाच्या भरती करताना मासिक वेतन हे स्केलनुसार पुढील प्रमाणे असेल
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या फ्रेंडशिप या पदाच्या भरतीसाठी ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल त्या उमेदवारांना ग्रामीण शहरी आणि मेट्रो या तिन्ही ब्रांच मध्ये उमेदवाराला 15,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे
- या तीनही ब्रांच पैकी कोणत्याही ब्रांच मध्ये उमेदवाराची सिलेक्शन झाले तरी पण त्याला तेवढेच वेतन मिळणार आहे
महत्वाच्या लिंक्स
या भरतीसाठी असणाऱ्या सर्व महत्त्वाच्या लिंक्स तुम्हाला खाली देण्यात आलेले आहे त्यानुसार तुम्ही त्या लिंक चा योग्य तो वापर करून तुम्हाला या भरती विषयीची माहिती आणि या वेबसाईट विषयीची माहिती आणि तुम्ही तिथून तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करू शकता
या भारतीबद्दलची PDF जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
या पदाच्या भरती साठी ऑनलाईन अर्ज येथून करा
शुद्धी पत्रक PDF येथे बघा
अधिकृत वेबसाईट येथे पहा
Important Dates
महत्वाच्या तारखा
या पदाच्या भरतीसाठी असणारे महत्त्वाचे तारीख ह्या पुढील प्रमाणे असेल
अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 फेब्रुवारी 2024 |
ऑनलाइन अर्ज बंद होण्याची तारीख | 17 जून 2024 |
ऑनलाइन परीक्षेची तारीख | 23 जून 2024 |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या अप्रेंटिसशिप या पदाच्या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे त्यानुसार वरती दिलेल्या ऑनलाईन अर्ज यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सादर करावयाचा आहे
अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती हे व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक भरावयाची आहे
अर्ज भरून झाल्यावर तो सबमिट करावयाचा आहे
उमेदवाराने आपला अर्ज भरण्याअगोदर सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून देण्यात आलेली PDF ही व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक वाचून घ्यावी त्यानंतर आत्ताच प्रसिद्ध झालेले शुद्धिपत्रक सुद्धा उमेदवारांनी एकदा काळजीपूर्वक वाचावे
या शुद्धी पत्रकानुसार उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत वाढवून देण्यात आलेले आहे
उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर त्यानंतर जे उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे अशा उमेदवारांची 23 जून 2024 रोजी एक ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे
त्यानुसार जे उमेदवार या परीक्षेत पास होतील अशा उमेदवारांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अप्रेंटिसशिप या पदाच्या भरती करता पुढील टास्कमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे
उमेदवारांनी एक लक्षात ठेवावे अर्ज करण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष हे उमेदवाराने पूर्ण केलेले आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी
या अर्जासाठी फी भरण्याच्या शेवटच्या दिवशी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्जाची फी ही जमा केल्यावरती तुमच्या अर्जाची प्रक्रिया आहे पूर्ण होणार आहे
पात्रता परीक्षेचा निकाल हा नंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईट वरती लावण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी
या पदभरतीमध्ये उमेदवारांची निवड ही काही विशिष्ट Criteria नुसार करण्यात येणार आहे
सर्वप्रथम उमेदवाराची ऑनलाइन रिटर्न टेस्ट घेण्यात येणार आहे ही ऑनलाईन टेस्ट ही बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे त्यामध्ये काही विशिष्ट विषयांवर ती टेस्ट घेण्यात येणार आहे
या टेस्टमध्ये जे उमेदवार पास होतील अशा उमेदवारांची मेरिट लिस्ट लावण्यात येईल त्यानुसार उमेदवारांनी आपले नाव मेरिटमध्ये आले का नाही ते चेक करून पुढील प्रोसेस साठी उमेदवार हा ग्राह्य धरला जाईल
एखाद्या वेळेस बरेच उमेदवारांना सारखे मार्क मिळाल्यावर ती अशा उमेदवारांसाठी निवड प्रक्रिया मध्ये तरतूद करण्यात आली आहे ती म्हणजे ज्या उमेदवारांना सारखे मार्ग पडतील त्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराची जन्मतारीख ही सगळ्यात कमी असेल अशा उमेदवारांना या भरतीसाठी निवडले जाईल
नंतर उमेदवाराची लोकल लँग्वेज टेस्ट घेण्यात येईल यामध्ये उमेदवाराला आपल्या मातृभाषेचे ज्ञान अवगत असणे गरजेचे आहे
Central Bank Of India Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “सेवानिवृत्त सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी” पदांच्या जागांसाठी भरती सुरु ,त्वरित पाठवा तुमचा अर्ज
Note
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या अप्रेंटिसशिप या पदासाठी जे उमेदवारांची निवड होईल तेव्हा उमेदवारांना 12 महिने काम करण्याची संधी असेल
त्यानंतर उमेदवाराला पुढे कंटिन्यू करायचे की नाही हे सर्वस्वी निर्णय हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडे राखून ठेवण्यात आलेला आहे
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.
3 thoughts on “Central Bank Of India Apprentice Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदासाठी मोठी भरती लवकरात लवकर अर्ज करा”