HSC Result 2024: 12वी चा निकाल आज होणार जाहीर, अखेर प्रतीक्षा संपली , येथे बघू शकता तुम्ही निकाल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

 

HSC Result 2024 : नमस्कार मित्रांनो बारावीच्या पेपर दिलेल्या मुलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आले आहे ती म्हणजे बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने लागणार आहे तरी पण तो निकाल आपण येथे बघणार आहे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा (MSBSHSE) मार्फत एक अत्यंत अशी महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी घोषणा करण्यात आली आहे ती म्हणजे HSC Result 2024  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून बारावी साठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आज म्हणजे 21 मे 2024 रोजी दुपारी 1 नंतर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून आपल्या निकालाची वाट बघत होते अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे थोड्या दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या बोर्डाकडून बारावीचा निकाल हा लवकरच लागणार आहे असे स्पष्ट करण्यात आले होते त्यामध्ये स्पष्ट सांगितले होते की बारावीचा निकाल हा मे च्या तिसऱ्या आठवड्यात दरम्यान लागेल त्यानुसार आता नुकताच बोर्डाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे की निकाल हा आज 21 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता लागणार आहे त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी एक नंतर ऑनलाईन पद्धतीने बघण्यास मिळणार आहे

HSC Result 2024 – Overview

मंडळाचे नावमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)
परीक्षेचे नावHSC परीक्षा फेब्रुवारी 2024
परीक्षेची तारीख21 फेब्रुवारी 2024 ते 19 मार्च 2024
एकूण परीक्षा दिलेले विद्यार्थी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थी
निकालाची तारीख21 मे 2024
निकालाची वेळदुपारी १ वाजता
आवश्यक गोष्टसीट/ रोल नंबर आणि आईचे नाव
अधिकृत वेबसाइटhttps://mahresult.nic.in/

How to check 12th Result 12 विचा निकाल कसा चेक करावा

HSC Result 2024 

आज बारावीच्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असून त्यांनी केलेल्या वर्षभरात च्या मेहनतीचे आज त्यांना फळ भेटणार आहे आज बारावी एचएससी चा रिझल्ट लागणार असून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस इथून पुढे सुरुवात होणार आहे तरी पण हा निकाल आपण पुढील प्रकारे आपल्याला बघता येईल

तुम्ही तुमचा निकाल मोबाईल मध्ये पण बघू शकता त्यासाठी खालील दिलेल्या स्टेप चा वापर करा

  • सर्व प्रथम तुम्हाला एच एस सी च्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावे लागेल तिथून तुम्हाला तुमचा रिझल्ट बघायला भेटेल
  • त्यानुसार तुम्हाला https://mahresult.nic.in/ वेबसाईट वरती गेल्यावरती एक पेज ओपन होईल
  • त्या पेज मध्ये तुम्हाला तुमचा सीट नंबर आणि तुमचे आईचे नाव टाकायचे आहे
  • नंतर तुम्हाला View Result या बटणावर क्लिक करायचे आहे
  • तुमचा निकाल डाऊनलोड करण्यासाठी समोर पेज वरती दिसेल
  • तेथून तुम्ही तुमचा निकाल बघू शकता किंवा डाऊनलोड करू शकता.
  • अशा प्रकारे तुम्ही तुमचा Result बघू शकता .

तुम्हाला निकाल हा पुढील वेबसाईटवर पाहता येणार आहे

  1. https://www.mahahsscboard.in/mr
  2. https://mahresult.nic.in/

 

HSC Result 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एक परिपत्रक जारी करण्यात आले असून या परिपत्रकात निकाला संदर्भात आणि गुण पडताळणीच्या विषया संदर्भात माहिती देण्यात आली असून मंगळवारी हा निकाल जाहीर झाल्या नंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिकेची पडताळणी सुद्धा करता येणार असून त्यासाठीची माहिती या परिपत्रकात जारी करण्यात आली आहे ऑनलाईन निकाल नंतर इयत्ता बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी श्रेणी विषयाव्यतिरिक्त कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेले गुणांची पडताळणी त्याला या परिपत्रकाच्या माध्यमातून करता येणार आहे

HSC Result 2024 पुनर्मूल्यांकन

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज हा शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरून करण्यासाठी त्या अगोदर उत्तरपत्रिकेची प्रिंट घेणे आवश्यक असून ती प्रिंट आपल्याला मिळाल्यानंतर त्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाचा अवलंब करून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे हे अनिवार्य आहे.त्या नंतरच विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन केले जाणार आहे

ह्या वर्षीपासून विद्यार्थ्यांची श्रेणी सुधारण्यासाठी बारावीच्या परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोनच संधी (जुलै-ऑगस्ट 2024 आणि फेब्रुवारी-मार्च 2025) ह्या श्रेणीसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

HSC Result 2024 

जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पूणपर्रिक्षार्थी, श्रेणीसुधार विद्यार्थ्यांनी आपले अर्ज हे २७ मे २०२४ पासून मंडळाच्या वेबसाईट वरती ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचे आहे . त्याबाबतचे परिपत्रक जाहिरात स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

HSC Result 2024 राज्यातील 15 लाख 13 हजार 909  विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी

ह्या वर्षी बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी2024  ते 23 मार्च 2024 या कालावधीत पार पडली आहे . ह्या वर्षी महाराष्ट्र राज्यातील जवळपास 15.13 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी करण्यात अली होती. या नोंदणी मध्ये विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 7 लाख 60 हजार 46 विद्यार्थी, कला शाखेसाठी 3 लाख 81 हजार 982 विद्यार्थी, वाणिज्य शाखेसाठी 3 लाख 29 हजार 905 विद्यार्थी , व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 37 हजार 225 विद्यार्थी, आयटीआयसाठी 4 हजार 750 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला होता. MSBSHSE नियमांनुसार, बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण घोषित होण्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी आणि तोंडी परीक्षांमध्ये मिळून किमान 35 टक्के गुण मिळणे हे अनिवार्य आहे.

डिजीलॉकर मध्ये गुणपत्रिका संग्रहीत करता येणार

परीक्षेस पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका Store करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. www.mahresult.nic.in या वेबसाईट वरती  विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या वेबसाईट वर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

HSC Result 2024

फेब्रुवारी-मार्च 2024 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छाया प्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

HSC Result 2024 

फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट 2024 व फेब्रुवारी-मार्च 2025) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

HSC Result 2024 जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक 27/05/2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

नवीन भरती अपडेट :-

 

 

 

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading