Table of Contents
PM Matru Vandana Yojana 2024 : नमस्कार भारत सरकारच्या माध्यमातून विशेष गर्भवती महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही योजना भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालय या विभागांतर्गत सुरू करण्यात आली असून या योजनेमुळे देशभरातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे
या योजनेअंतर्गत जी महिला आहे गर्भवती आहे अशा महिलेला वेगवेगळ्या हप्त्यांमधून 11000 रुपये ची आर्थिक मदत ही लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत जी महिला गर्भवती आहे व जी महिला स्तनदा आहे अशा महिलांना या योजनेचा खास करून लाभ होणार आहे त्यामुळे अशा महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा योजनेविषयी असणारे सर्व माहिती ही तुम्हाला खाली या आर्टिकल मध्ये बघायला मिळणार आहे त्यानुसार तुम्ही ही पोस्ट काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की पहा
PM Matru Vandana Yojana 2024 माहिती
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही योजना भारत सरकारच्या अधिपत्याखाली असून या योजनेचा फायदा भारतातील कोणत्याही राज्यातील महिलेला घेता येणार आहे आणि त्या महिला म्हणजे ज्या महिला ह्या गर्भवती किंवा स्तनदा महिला असतील अशा महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेअंतर्गत जी महिला ही पहिल्यांदा गर्भवती होणार आहे अशा महिलांना तीन टप्प्यांमध्ये 11000 रुपये एवढे सहाय्यता दिली मिळणार आहे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिला गर्भवती असते किंवा स्तनदा असते अशा महिलांनी ऑनलाईन अथवा ऑफलाइन या दोन्हीपैकी कोणत्यातरी पद्धतीने आपला अर्ज सादर करावयाचा आहे ही योजना प्रधानमंत्री गर्भावस्था सहायता योजना या नावाने सुद्धा ओळखले जाते या योजनेअंतर्गत घडत असणाऱ्या माता आणि त्यांचे असणारे नवीन जन्मलेली मुले यांच्यासाठी एक सुरक्षा कवच असल्याचे काम करणार आहे
योजनेचे नाव | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना |
योजना कोणी सुरू केली | भारत सरकार |
योजनेची लाभार्थी | देशातील गर्भवती व स्तनदा महिला |
योजनेचा आरंभ | जानेवारी 2024 |
विभाग | महिला व बाल कल्याण विभाग |
योजनेचा उद्देश | माहिती गर्भवती व स्तनदा महिला याना आर्थिक मदत प्रदान करणे |
श्रेणी | केंद्र सरकार योजना |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन / ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://pmmvy.wcd.gov.in/ |
PM Matru Vandana Yojana 2024 Details
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 – फायदे
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनेअंतर्गत जी महिला गर्भवती आहे अशा महिलांना लाभ मिळतो तो लाभ हा दोन प्रकारे मिळत असतो सगळ्यात अगोदर ही महिला गर्भवती होते व तिला सर्वप्रथम मुलगी होते अशा महिलेला वित्तीय सहायता म्हणून पाच हजार रुपयांचे आर्थिक मदत या योजनेअंतर्गत केली जाते आणि तीच महिला जर दुसऱ्या वेळेस गर्भवती झाल्यास तिला दुसऱ्या वेळेस पण मुलगीच झाली तर त्या महिलेला आर्थिक सहाय्यता म्हणून सहा हजार रुपये दिले जाते अशाप्रकारे एकूण या योजनेअंतर्गत त्या महिलेला 11000 रुपयांचे आर्थिक मदत ही भारत सरकार द्वारा या योजनेअंतर्गत करण्यात येते
ही योजना महिलांना मातृत्वाच्या वेळेस एक चांगल्या प्रकारचे समर्थन देण्यासाठी बनवण्यात आली आहे
या योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनेसाठी अर्ज हा दोन्ही पद्धतीने करता येऊ शकतो म्हणजे ऑनलाइन पण आणि पण आपण अर्ज करू शकतो या दोन्ही पद्धतीने अर्ज कसे हे आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत
1) ऑनलाइन :-
- प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम त्यांच्या अधिकृत वेबसाईट https://pmmvy.wcd.gov.in/ वरती जावे लागेल
- अधिकृत वेबसाईट वर गेल्यावरती तुमच्यासमोर त्या वेबसाईटचे होमपेज ओपन होईल त्या होम पेज मध्ये सिटीजन लॉगिन( Citizen Login) हा पर्याय शोधायचा आहे
- हा पर्याय शोधल्यावरती त्याच्यावरती क्लिक करायचे आहे तर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल
पेज मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि खाली असलेल्या व्हेरिफाय (Verify) या बटनावरती क्लिक करावे लागेल - या बटनावरती क्लिक केल्यावर ती तुमचं नोंदणी होईल आणि तुमचा अर्ज हा तुमच्यासमोर ओपन होईल
त्या अर्जामध्ये विचारलेले सर्व माहिती ही व्यवस्थितपणे भरा - आणि त्याचबरोबर तुम्हाला विहित केलेले सर्व कागदपत्रे येथे अर्जासोबत स्कॅन करून अपलोड करून द्या. ही सर्व प्रोसेस झाल्यावरती
- तुमचा फॉर्म सबमिट करण्यासाठी खाली दिलेल्या सबमिट या बटनावरती क्लिक करा या बटनावरती क्लिक केल्यावर तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि तुम्हाला एक आयडी प्राप्त होईल
- तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुमची वित्तीय जे असणारी तुमची आर्थिक मदत ही तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल
- अशाप्रकारे तुम्ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता
2) ऑफलाईन :-
- या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज हा अशाप्रकारे करायचा आहे
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच असलेल्या अंगणवाडी केंद्राला भेट द्यायची आहे
- तिथे गेल्यावर ती प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी असणारा अर्ज हा घ्यायचा आहे
- अर्ज भेटल्यानंतर त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती हे व्यवस्थित रित्या भरायची आहे आणि त्यासोबत असलेले सर्व कागदपत्रे झेरॉक्स कॉपी या अर्जासोबत जोडून द्यायच्या आहेत
- हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर तो अर्ज तुम्ही ज्या अंगणवाडी केंद्रातून आणलाय तेथेच तो जमा करावयाचा आहे
- तो अर्ज तुम्ही तिथे जमा केल्यानंतर तुम्हाला एक पोहोच पावती देण्यात येईल ते पावती तुम्ही सांभाळून ठेवायचे आहे जेणेकरून भविष्यात कुठेही ती काम येऊ शकते
- अशाप्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता
या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे खालील प्रमाणे असतील त्यामुळे ज्या महिलांना या योजनेचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे
- आई-वडिलांचे आधार कार्ड
- आईचे बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- एल एम पी मासिक धर्माची शेवटची तारीख
- एम सी पी आई आणि बाल संरक्षण तारीख
या योजनांविषयी पण जाणून घ्या
तुमच्या मुलींसाठी सरकारची उत्तम योजना, मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत सरकार देणार आर्थिक मदत, लगेच करा नोंदणी
मुलींच्या लग्नाची चिंता होणार दूर 121 रुपये भरून मिळवा 27 लाख रुपये जाणून घेऊया संपूर्ण माहिती
या योजनेसाठी असणारी रक्कम हि कशी मिळते?
- या योजनेसाठी असणारी रक्कम पुढील टप्प्यांमध्ये मिळते
- जी महिला पहिल्या वेळेस आई होणार आहे त्या महिलेसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत पहिली जर मुलगी झाली तर तिला 5000/- रुपये दोन टप्प्यांमध्ये प्रदान करण्यात येते
- सर्वात अगोदर गर्भावस्थेत असलेल्या महिलेला तिने नोंदणी केल्यानंतर काही दिवसातच तिला 3000/- रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते आणि उर्वरित रक्कम ती महिला आई झाल्यानंतर ज्यावेळेस बाळाची नोंदणी केली जाते त्यावेळेस 2000/- रुपये त्या महिलेला दिले जाते
- आणि जर तीच महिला पुन्हा आई होणार असेल आणि त्या महिलेला पुन्हा मुलगीच हे आपत्य झाले असेल तर तिला आर्थिक मदत म्हणून 6000/- रुपये एवढी रक्कम देण्यात येते
- या योजनेचा लाभ अशा कुटुंबात होणार आहे जे कुटुंब मुली जन्मल्यानंतर स्वागत करतात
निष्कर्ष :-
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत ज्या महिला गर्भवती आणि स्तनदा आहे आणि त्या महिला गरीब कुटुंबातील आहे अशा महिलांसाठी आर्थिक मदत प्रदान करून भारत सरकार द्वारा एक चांगल्या प्रकारचा आणि विशेष अशा नवीन धोरणाचा या योजनेअंतर्गत निर्णय घेण्यात आलेला आहे या योजनेमुळे गरीब कुटुंबातील महिलांना आपल्या गर्भावस्थेत येणाऱ्या या दूर होणार आहे त्यामुळे ही योजना आहे अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोगी अशी असणारे योजना हे भारत सरकार आपल्या भारतातील तमाम महिलांसाठी राबवत आहे तसेच वरती दिलेली सर्व या योजनेबद्दल ची माहिती ही तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणार आहे आणि ही योजना खरच भरपूर महिलांना एक विशिष्ट प्रकारची कलाटणी देणारे योजना आह
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.