
PM Surya Ghar Yojana 2024 : नमस्कार आपल्या देशाचे पंतप्रधान “ नरेंद्र मोदी ” यांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत उपयोगी अशी योजना ती म्हणजेच ” पंतप्रधान सूर्य घर योजना “ सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशात सौरऊर्जेला चालना देण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशात राहणाऱ्या लाभार्थ्यांना ” 300 ” युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे. ” पीएम सूर्य घर योजनेच्या ” माध्यमातून देशातील कोट्यवधी घरांमध्ये वीज पोहोचवली जाणार आहे.
तुम्हाला जर या ” पीएम सूर्य घर योजनेसाठी ” अर्ज करायचा असेल तर तुम्ही भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजने विषयी माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे.ती माहिती तुम्हाला आमच्या या लेखात बघावयास मिळेल
Table of Contents
PM Surya Ghar Yojana 2024 :
आपल्या या भारत देशात राहणाऱ्या कोटय़वधी लोकांना वीज बिलांमुळे भरपूर प्रमाणात आर्थिक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या विजेची बचत करता येईल आणि सोलर सिस्टीमद्वारे वीज मिळेल. या योजनेच्या माध्यमातून देशातील केंद्र सरकारने 75000 कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले आहे. या योजनेच्या माध्यमातून एक कोटी घरांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेद्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही पण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता
योजनेचे नाव | पीएम सूर्य घर मोफत वीज योजना ( PM Surya Ghar Yojna ) |
योजनेचे लाभार्थी | भारत देशाचे नागरिक . |
योजनेचेउद्देश | मोफत वीज पुरवणे |
लाभ | 300 युनिट मोफत विजेचा सौर पॅनेल स्थापित करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत संकेतस्थळ / Website | pmsuryaghar.gov.in |
PM Surya Ghar Yojana 2024 साठी आवश्यक पात्रता :
- मुख्य म्हणजे तुम्ही भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
- तुमच्या कुटुंबातील सदस्यांपैकी कोणताही सदस्य शासकीय सेवेत कार्यरत नसावा.
- या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ” 31 मार्च 2024 ” आहे.
- तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असावे. म्हणजे तुमचे ” KYC ” झालेले असावे.
- तुमचे वार्षिक उत्पन्न ” 1.5 लाख ” रुपयांपेक्षा कमी असावे.
PM Surya Ghar Yojana 2024 चे फायदे :
- या योजनेअंतर्गत तुम्हाला 300 युनिटपर्यंत वीज पूर्णपणे मोफत दिली जाईल.
- अश्या या योजनेमुळे तुमची वीज बचत होऊन तुमचे वीज बिल अगदीच कामी येईल.
- या सुंदर अश्या योजनेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाबरोबरच सौर ऊर्जा शक्तीला चालना मिळणार आहे.
- हि योजना सुंदर योजना असून त्यात तुम्हाला एकाच वेळेस पैसे गुंतवायचे आहे आणि नंतर पूर्णआयुष्यभर वीज हि एकदम माफक दारात वापरायची आहे
- या PM Surya Ghar Yojna या योजनेचा फायदा एक असा होणार कीं प्रत्यके महिन्याला वीजबिल भरण्याचे टेन्शन राहणार नाही.
- 1 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे.
- सौर पॅनेल खरेदीसाठी कर्ज देण्यासाठी सरकार बँकांना मदत आणि मार्गदर्शन करेल.
PM Surya Ghar Yojana 2024 ची आवश्यक कागदपत्रे :
- उत्पन्न प्रमाणपत्र / उत्पनाचा दाखला .
- पत्त्याचा पुरावा / मूळ पत्ता असल्याचा पुरावा .
- शिधापत्रिका / राशन कार्ड .
- आधार कार्ड .
- वीज बिल .
- बँक खाते पासबुक .
- पासपोर्ट आकाराचा फोटो .
PM Surya Ghar Yojana 2024 : या योजनेसाठी साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा .
तुम्हाला जर PM Surya Ghar Yojana 2024 या योजने साठी ऑनलाइन पद्धतिने जर अर्ज करावयाचा जर असेल तर तुम्ही खालील दिलेल्या माहिती च्या आधारे अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करू शकता .
- सर्वात अगोदर तुम्हाला पीएम सूर्य घर योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .
- आता तुम्ही अधिकृत वेबसाइटच्या होम पेजवर आल्यावरती ” Apply For Rooftop Solar “ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
- तेथे तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव, तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि संपूर्ण माहिती हि अचूक भरावी लागेल.
- आता तुम्हाला तुमच्या विजेच्या तपशीलाचे नाव बदलावे लागेल आणि तुमचा खाते क्रमांक टाकावा लागेल.
- यानंतर तुम्हाला नोंदणी फॉर्मवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर फॉर्म उघडेल.
- मग तुम्हाला नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती आणि सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करावी लागतील.
- यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुम्ही पीएम सूर्य घर योजनेसाठी सहजपणे ऑनलाइन अर्ज करू शकता.
FAQ- पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेबद्दल :
1) पीएम सूर्य घर मोफत वीज योजना काय आहे ?
ही योजना मध्यम आणि गरीब कुटुंबांना दरमहा 300 युनिट मोफत वीज देण्यासाठी आणि सौर छताद्वारे उत्पन्न वाढवणारी योजना आहे.
2) पीएम सूर्य घर मुफ्त वीज योजनेत किती सबसिडी उपलब्ध आहे ?
30,000/- रुपये प्रति किलोवॅट उपलब्ध आहे. कमाल अनुदान रु. 78,000/- रुपये उपलब्ध आहेत.
3) पीएम सूर्य घर मुफ्त वीज योजनेचा लाभ किती लोकांना मिळणार ?
पहिल्या स्तरावर 1 कोटी लोकांना मिळेल, नंतर मर्यादा वाढवता येईल.
4) पीएम सूर्य घर मुफ्त वीज योजनेसाठी कर्ज कुठे मिळेल ?
सर्व राष्ट्रीयीकृत बँकांमधून
5) पीएम सूर्य घर मुफ्त वीज योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल का ?
होय, या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो.
6) पंतप्रधान सूर्य घर मुफ्त वीज योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?
भारतातील प्रत्येक नागरिक पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेचा लाभ घेऊ शकतो, परंतु त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.
7) पीएम सूर्य घर मुफ्त वीज योजना कशाशी संबंधित आहे ?
पीएम सूर्य घर मुफ्त वीज योजना मोफत वीज पुरवण्याशी जोडलेली आहे.
8) पीएम सूर्य घर मुफ्त वीज योजना कधी सुरू करण्यात आली ?
पीएम सूर्य घर मुफ्त वीज योजना 13 Feb 2024 रोजी सुरू करण्यात आली.
9) ) पीएम सूर्य घर मुफ्त वीज योजना कधी बंद होणार ?
पीएम सूर्य घर मुफ्त वीज योजना 31 March 2024 रोजी बंद होणार
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.