PM Awas Yojana 2024: या योजने अंतर्गत लाभार्त्याला मिळणार 2.50 लाख रुपये , लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

PM Awas Yojana 2024 : भारत सरकार द्वारा वेळोवेळी गरिबांच्या हितासाठी भरपूर योजना सुरू करण्यात आले असून त्यातलीच ही एक योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ही योजना 01 जून 2015 रोजी सुरू करण्यात आली असून दरवर्षी या योजनेत थोडेफार बदल करून ही योजना पूर्णपणे पुढे राबविण्यात येते या योजनेमुळे गरीब कुटुंबातील लोकांना त्यांना राहण्यासाठी पक्की घरे मिळावी या हेतूने या योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता त्या अनुषंगाने बरेच लाभार्थ्यांना या योजने चा लाभ सुद्धा घेतला आहे

या योजनेची अधिक माहिती

PM Awas Yojana 2024
PM Awas Yojana 2024

प्रधानमंत्री आवास योजना ही योजना केंद्र सरकार द्वारा सुरू करण्यात आलेली एक अत्यंत अशी गरिबांसाठी जीवनदायी ठरलेली योजना आहे या योजनेमुळे ज्या गरीब वर्गातील लोकांना त्यांच्या स्वप्नातील पक्क्या घरात राहण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे

या योजनेअंतर्गत शहरात आणि गावात राहणारे या योजनेचा फायदा घेऊ शकतात या प्रधानमंत्री आवास योजना साठी आपल्याला दोन्ही पद्धतीने एप्लीकेशन करता येते ते म्हणजे ऑनलाईन पण आणि ऑफलाइन पण या योजनेसंबंधी असणारी सर्व माहिती खाली या पोस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे यात प्रामुख्याने या योजनेत कोण पात्र असणार या योजनेसाठी कोण कोणते डॉक्युमेंट लागणार या योजनेसाठी अर्ज कसा करायचा व कुणाकडे करायचा या योजनेचा फायदा काय असणार आहे इतर सर्व विषयांवरती या पोस्टमध्ये तुम्हाला माहिती बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ही पोस्ट काळजीपूर्वक वाचा जेणेकरून कुठल्याही माहिती पासून तुम्ही दूर राहिले नाही पाहिजे

प्रधानमंत्री आवास योजना 2024 आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड
  •  पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  •  रहिवासी प्रमाणपत्र
  • घराचे प्रमाणपत्र किंवा घराचा उतारा
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक अकाउंट स्टेटमेंट
  • बांधकाम कॉन्ट्रॅक्टर चे डॉक्युमेंट
  • तुमचा पासपोर्ट फोटो
  • सध्या राहत असलेल्या जागेचा फोटो
  • विवाह प्रमाणपत्र
  • जाती प्रमाणपत्र
  • अपंग असलेले प्रमाणपत्र
  • इत्यादी

या योजनेसाठी वरील दिलेल्या सर्व डॉक्युमेंट किंवा कागदपत्रे हे गरजेचे आहे ज्यावेळेस तुम्ही योजनेसाठी अर्ज करत आहात त्यावेळेस तुमच्याकडे यातले सर्व डॉक्युमेंट हे असायला हवी

PM Awas Yojana 2024 या योजनेचे उद्देश्य

या योजनेचे उद्देश सांगायचं ठरलं तर ही योजना केंद्र सरकार द्वारे गरिबांसाठी असणारी योजना आहे ही योजना 2015 रोजी प्रधानमंत्री आवास योजना या नावाने सुरू करण्यात आली असून ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुषंगाने सुरू करण्यात आली असून या योजनेचा फायदा हा ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब लोकांसाठी हा नक्कीच होणार आहे या योजनेअंतर्गत गरीब लोकांसाठी त्यांना त्यांची हक्काची घरे मिळावी व ती घरेही पक्की असून त्यासाठी लागणारा खर्च हा गरीब लोकांसाठी हा सरकारच्या माध्यमातून दिला जावा हा या योजनेचा हेतू आहे आणि गरीब घरातील लोकांना सुद्धा एक चांगल्या प्रकारचा निवारा हा या योजनेच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे

या योजनेसाठी अर्ज हा कसा करावा ?

  1. या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज हा ऑनलाइन स्वरूपात करायचा असेल तर तुम्हाला खालील दिलेल्या माहितीच्या आधारावरून तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता
  2. सर्वप्रथम तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या उत्पन्न गटात बसत आहे अगोदर चेक करून घ्या त्यानुसारच तुम्ही तुमचा अर्ज भरा
  3. यानंतर प्रधानमंत्री आवास योजना असलेले अधिकृत वेबसाईट https://pmaymis.gov.in/ वरती भेट द्या
  4. या वेबसाईटला भेट दिल्यावर ती तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्या पेज मधून रजिस्ट्रेशन केल्यावरती लॉग इन करा
  5. गेल्यावरती तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये सिटीजन असेसमेंट या बटनावरती तुम्हाला क्लिक करावे लागेल
  6. त्यानंतर तुमच्यासमोर अजून एक पेज ओपन होईल त्यामध्ये For Slum dwellers किंवा Benefit under other 3k या ऑप्शन वरती क्लिक करा
  7. हे ऑप्शन वर क्लिक केल्यावर ते तुम्हाला समोर तुमचा आधार नंबर टाकण्यासाठी विचारेल तेथे तुमचा आधार कार्ड नंबर हा प्रविष्ट करून द्या नंतर त्याखाली असणारे चेक या बटणावरती क्लिक करा
  8. हे केल्यावर ती तुमच्यासमोर अजून एक पेज ओपन होईल त्या पेज मध्ये विचारलेले तुम्हाला सर्व माहितीही काळजीपूर्वक व बिनचूक भरवयाची आहे
  9. यामध्ये तुमचे नाव कॉन्टॅक्ट नंबर आणि इतर पर्सनल माहिती बँक अकाउंट स्टेटमेंट इत्यादी माहिती भरावी लागेल
  10. सर्व माहिती भरल्यानंतर खाली स्क्रोल करत या आणि खाली कॅपच्या कोड या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शन वर क्लिक केल्यावर ती तुमच्या समोर एक कॅपच्या येईल तो कॅपच्या कडून तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकावा लागेल तो कोड टाकल्यावरती
  11. नंतर शेवट सेव या बटणावरती क्लिक करा
  12. अशाप्रकारे तुमचा ऑनलाईन अर्ज हा प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पाठवला जाईल

या योजनेची विशेष माहिती

योजनेचे नावप्रधानमंत्री आवास योजना
योजना कोणी सुरू केलीभारत सरकार
योजनेची लाभार्थीग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबासाठी
योजनेचा आरंभ01 जून 2015
विभागरस्ते व बांधकाम विभाग
योजनेचा उद्देशग्रामीण आणि शहरी भागातील गरीब लोकांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं व त्यांना योग्य निवारा मिळावा
श्रेणीकेंद्र सरकार योजना
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट https://pmaymis.gov.in/

PM Awas Yojana 2024 Highights

या योजनेची पात्रता निकष

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी असणारे पात्रता निकष हे खालील प्रमाणे असतील या योजनेसाठी जो उमेदवार अर्ज करणार आहे हे पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे तेव्हाच त्या उमेदवाराला या योजनेचा लाभ मिळू शकतो

  • अर्ज करणारा उमेदवार हा भारतात राहणारा असावा
  • त्या उमेदवाराच्या नावावरती पक्के घर नसावे
  • त्या उमेदवाराचे वार्षिक उत्पन्न हे ठरवून दिलेल्या टप्प्या ंमध्येच असावे त्यानुसार या योजनेचा त्याला लाभ घेता येणार आहे
  • तो उमेदवार हा गरीब कुटुंबातील असावा
  • शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील योजनेमध्ये पूर्णपणे बदल आहे

या योजनेची नवीन अपडेट्स

  • आपल्या देशाचे असलेले नवनिर्वाचित तिसऱ्यांदी पंतप्रधान पदाची शपथ घेणारे माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी 9 जून 2024 रोजी या योजनेविषयी विशेष घोषणा केली ती म्हणजे या योजनेअंतर्गत पुढील येणाऱ्या काळामध्ये तीन कोटी घरे बांधण्याचा निर्धार या योजनेअंतर्गत केला आहे
  • यामध्ये दोन कोटी घरे हे ग्रामीण भागात बांधणारा असून आणि एक कोटी घरे हे शहरी भागात बांधणारा असून त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रोसेस सुद्धा सुरू झाली आहे
  • तसेच या योजनेत अंतर्गत मिळणारे रक्कम ही वाढवण्यात आली असून पहिले हे रक्कम एक लाख 90 हजार रुपये भेटत होती तर आताही अडीच लाखा पर्यंत भेटणार आहे
  • आणि विशेष म्हणजे या योजनेत घरासोबतच शौचालय वीज एलपीजी कनेक्शन नळ जोडणी इत्यादी सुविधा यासोबत प्रदान करण्यात येणार आहे
  • यामुळे लवकरच ज्या कुटुंबाला पक्की घरे नाहीयेत त्या कुटुंबांना पक्की घरे मिळणार आहेत अशी या योजनेसाठी विशिष्ट प्रकारची तरतूद ही केंद्र सरकार द्वारे करण्यात आलेली आहे

निष्कर्ष

या पंतप्रधान आवास योजनेचा निष्कर्ष हा असा निघतो की भारत सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली योजना ही गरिबांसाठी ही जीवनदायी योजना ठरलेली आहे या योजनेमुळे जे गरीब कुटुंबातील व्यक्ती आहे ते आपल्या कुटुंबासाठी व्यवस्थित व पक्के घरे बांधू शकत नव्हते किंवा त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल अशा कुटुंबासाठी ही योजना म्हणजे एक उत्तम प्रकारची व सुवर्णसंधीच जणू आहे प्रधानमंत्री आवास योजनेमुळे तुझ्या गर्भ कुटुंबातील व्यक्तींचे स्वप्न होते की आपल्याला पण पक्के घर असावी व पक्का निवारा असावा हे स्वप्न त्यांचे या योजनेमुळे पूर्णत्वात येणार आहे

या योजनेविषयी पण जाणून घ्या

PM Surya Ghar Yojana 2024: Apply Online, प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी अर्ज करा

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading