1Rs Peak Vima Yojna 2023-2024 : १ रुपयात पीक विमा योजना २०२३-२०२४ :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

1Rs Peak Vima Yojna 2023-2024 :नमस्कार शेतकरी मित्रानो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची व आनंदाची बातमी अली आहे . नुकतेच झालेल्या अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली कि ” १ रुपयात पीक विमा योजना २०२३-२०२४ “ महाराष्ट्र्रातील सर्व शेतकरी बांधवांना फक्त १ रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे हि योजना २०२३-२०२४पासून राबविण्यात येणार आहे. या योजने मध्ये खरीप आणि रब्बी असे दोन्ही पिकांचा समावेश असणार आहे.

१ रुपयात पीक विमा योजना २०२३-२०२४ /1Rs Peak Vima Yojna 2023-2024 :

१ रुपयात पीक विमा योजना २०२३-२०२४ /1Rs Peak Vima Yojna 2023-2024 ” :

हि योजना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत असून या योजने मध्ये शेतकऱ्यांनी भरवायचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के आणि रब्बी हंगामासाठी हि दीड टक्के इतकी आहे तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के इतके मर्यादित ठेवले आहे .
सर्व समावेशक पीक विमा योजने अंतर्गत सदरच्या शेतकरी हिश्याचा भार सुद्धा शेतकऱ्याची विमा हप्ता रक्कम हे राज्य शासना मार्फत भरण्यात येणार आहे
त्यामुळे सन २०२३ – २०२४ पासून शेतकऱ्यांना फक्त १ रुपया भरून पीक विमा पोर्टल वर आपली पीकविमा नोंदणी करता येईल

प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत ठरलेली शेतकऱ्यांच्या वाट्याची पीक निहाय प्रति हेक्टरी विमा हप्ता रक्कम व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरवायचा विमा हप्ता रक्कम त्यातून १ रुपया वजा केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहणार आहे . ती रक्कम राज्य शासन हे राज्य हिस्सा अनुदान स्वरूपात भरणार आहे .
त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा हप्ता फक्त आणि फकत १ रुपये असणार आहे .

सर्व समावेशक पीक विमा योजनेमध्ये खरीप आणि रब्बी हंगामासाठी काही जोखीमींच्या / नुकसानीच्या बाबींचा समावेश केला गेला आहे त्या बाबी पुढीलप्रमाणे असतील :

  1. हवामानातील बदलामुळे जर पाऊस वेळेवर न झाल्यामुळे पेरणीसाठी व लागवडीसाठी जर उशीर झाला तर त्यामुळे होणारे नुकसान .
  2. पिकांच्या हंगामामध्ये वातावरणातल्या होणाऱ्या बदलामुळे होणारे पिकांचे नुकसान .
  3. पीक पेरणीपासून ते काढणी पर्यंत च्या काळामध्ये नैसर्गिक आपत्ती मुळे जसे कि ” नैसर्गिक आग , वीज कोसळणे , गारपिट , वादळ येणे ,चक्रिवादळ होणे ,पूर येणे ,भूस्खलन , दुष्काळ , पावसातील खंड , कीड रोग , इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट
  4. स्थानिक नैसर्गिक आप्पती मुळे होणारे पिकांचे नुकसान .
  5. नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी नंतरचे नुकसान इत्यादी सर्व गोष्टींमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे .
  6. भात , गहू , सोयाबीन , कापूस , इत्यादी पिकांच्या ३० % भारांकन तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन त्याचा पीक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त उत्पन्नाशी मिळून पिकांचे सरासरी नुकसान निश्चित करणार आहे

अधिक माहितीसाठी शासनाचा ” GR ” : 👉 येथे पहा

पीक विमा भरण्यासाठी आवशयक असणारे कागदपत्रे / Important Document Peak Vima :

  1. आधार कार्ड / Aadhar Card .
  2. पीकपेरा अहवाल / Peak Pera Ahwal.
  3. मोबाइल नंबर / Mobile Number .
  4. ७/१२ / 7/12 .
  5. ८-अ / 8-A .
  6. बँक पासबुक / Bank Passbook .

वरील सर्व कागदपत्रे घेऊन सेतू मध्ये आजच पीक विमा भरून या .


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading