LIC Kanyadan Yojana 2024 : मुलींच्या लग्नाची चिंता होणार दूर 121 रुपये भरून मिळवा 27 लाख रुपये जाणून घेऊया संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

LIC Kanyadan Yojana 2024 : नमस्कार केंद्र सरकार द्वारे मुलींसाठी भरपूर योजना राबवल्या जातात दरवर्षी काही ना काही नवीन योजना हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार मिळून मुलींसाठी राबवतात या योजना पैकी एक योजना म्हणजे एलआयसी कन्यादान योजना ही योजना एक अत्यंत महत्त्वाचे सुंदर योजना असून या योजनेअंतर्गत मुलींसाठी भरपूर असा फायदा होणार आहे

कारण या योजनेअंतर्गत मुलीच्या आई-वडिलांना तिच्या लग्नाचे कुठलेही टेन्शन राहणार नाही पण यासाठी मुलीच्या आई वडिलांना तिच्या जन्मापासूनच थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट ही या योजनेअंतर्गत करावी लागेल तेव्हाच या योजनेचा पूर्ण पुरेपूर फायदा हा मुलींसाठी किंवा तिच्या आई-वडिलांसाठी हा नक्कीच होणार आहे त्यामुळे या योजनेविषयी असणारी संपूर्ण माहिती तुम्हाला आज या पोस्टमध्ये बघायला मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या मुली बद्दलचे असणारे भविष्याची काळजी ही दूर करण्याचा प्रयत्न या पोस्टच्या माध्यमातून करणार आहे

LIC Kanyadan Yojana 2024 अधिक माहिती 

ही योजना एक अशी योजना आहे जी खास करून महाराष्ट्रातील मुलींसाठी योजना राबवली जात आहे आपण पाहतो की गरीब घरातील जी मुले असतात त्यांना आर्थिक परिस्थितीचा खूप सामना करावा लागतो त्यामुळे या योजनेच्या मदतीने त्या मुलींचा पाल्यांवर भविष्यात येणारे संकट खूप कमी होणार आहे एलआयसी कन्यादान योजनेबद्दल सांगायचे ठरले तर ही योजना एक अत्यंत सुंदर अशी योजना असून या योजनेमुळे बऱ्याचशा मुलींचे शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्चाचा विषय हा जवळ जवळ मिटणार आहे त्यामुळे तुम्हाला जर मुलगी असेल तर तुम्ही या योजनेचा फायदा नक्कीच घ्यायला पाहिजे तुम्ही योजना अंतर्गत कमी प्रीमियम मध्ये जास्त फायदा कसा मिळवता येईल याची संपूर्ण माहिती तुम्हाला येथे बघायला मिळणार आहे तसेच ही स्कीम भारतीय आयुष्य विमा अंतर्गत LIC Kanyadan Yojana 2024 यांच्यातर्फे राबवली जात

तुमची मुलगी जर एक वर्षाची असेल तर तुम्ही तेव्हापासूनच या योजनेची सुरुवात करू शकता या योजनेअंतर्गत तुम्ही जर त्या मुलीच्या नावे दररोज 121 रुपये जर टाकत गेले तर त्याचे महिन्याला 3630 आणि वर्षाला 43,560/-  रुपये एवढी रक्कम होईल तर तुम्ही दरवर्षी एवढी रक्कम जर भरत गेले आणि हे जर फक्त तेरा वर्षे जर भरले तर तुम्हाला तेरा वर्षांनी तुम्हाला 10 लाख रुपये मिळणार आहे आणि जर तुम्ही ही रक्कम मुलीचे वय 25 वर्ष होईपर्यंत जर भरत गेले तर तुम्हाला 25 वर्षांनी ती रक्कम ही 27 लाख रुपये एवढे मिळणार आहे त्यामुळे ज्या वेळेस तुमच्या मुलीचं पुढचे भविष्याची चिंता ही मिटणार आहे त्यामुळे लगेचच तुम्ही या या पॉलिसीचा फायदा घ्यावा आणि आपल्या मुलीची नोंदणी करावी.

या योजनेची वैशिष्ट्य कोण कोणती आहेत 

एलआयसी कन्यादान पॉलिसी ही एक उत्तम अशी पॉलिसी असून ज्यामुळे मुलींच्या पालकांना विशिष्ट प्रकारचा आधार मिळतो जेणेकरून मुलींचे संगोपन करत असताना त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे अडचण येऊ नये किंवा मुलींना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे किंवा मुलींचे असणारे सर्व अडचणी दूर व्हाव्यात आणि मुलीने ठरवलेले प्रत्येक स्वप्न त्याचे पूर्ण व्हावे त्या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेचे काही विशिष्ट वैशिष्ट्ये पण आहे ते वैशिष्ट्य हे पुढील प्रमाणे असतील
  • सर्वात प्रथम मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या योजनेतून तुमच्या मुलींना आर्थिक सुरक्षिता प्राप्त होणार आहे
  • या योजने जो पॉलिसीधारक आहे त्या पॉलिसी धारकाला या पॉलिसी च्या संपण्यापूर्वी वेळी म्हणजे शेवटी एक रकमे पेमेंट हे पॉलिसीचे भेटते
  • जे या पॉलिसीमध्ये विमाधारक पालक आहे त्यांचे जर निधन झाल्यास त्या पॉलिसीचे प्रीमियम हे माफ केले जाते
  • आणि यामध्ये जर अपघाती निधन जर झाले तर त्यावेळेस पॉलिसी धारकाच्या कुटुंबीयांना तात्काळ दहा लाख रुपये देण्यात येते
  • आणि नैसर्गिक मृत्यू  झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत देण्यात येते
  • आणि या पॉलिसीच्या मुदतपूर्वी च्या तारखेपर्यंत दरवर्षी पॉलिसी धारकाला 50 हजार रुपये देण्यात येते
  • आणि पॉलिसी मॅच्युरिटी च्या वेळेस पूर्ण मॅच्युरिटी रक्कम भरावी लागते
  • पॉलिसी संपायच्या तीन वर्षापर्यंत त्या कालावधी करता जीवन जोखीम कव्हर हा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे
  • जे पालक हे हा देश सोडून दुसऱ्या देशात राहतात त्यांना सुद्धा या पॉलिसी चा फायदा घेऊ शकता येतो
  • अशाप्रकारे आणखी काही अनेक वैशिष्ट्य पण आहे

या योजनेसाठी साठी असणारी पात्रता

  • एलआयसी कन्यादान योजना पात्रता या योजनेसाठी अर्ज हे मुलीचे आई-वडीलच करू शकतात दुसरे कोणाला या योजनेचा अर्ज करता येणार नाही
  • आणि या योजनेसाठी फक्त मुलीच ह्या पात्रता असणार आहे
  • या योजनेसाठी मुलीचे वय हे तेरा वर्ष ते पंचवीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे
  • ज्यावेळेस तुम्ही अर्ज करताल त्यावेळेस पासून पुढील 25 वर्षा नंतर तुम्हाला 27 लाख रुपये एवढी रक्कम मिळणार आहे
  • या 27 लाख रुपये मिळण्यासाठी तुम्हाला कमीत कमी प्रत्येक दिवसाला 121 रुपये जमा करावे लागतील प्रति महिना तुम्हाला 3600 रुपये एवढे जण करावे लागणार आहे
  • या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे भारतीय नागरिकत्व असणे अनिवार्य आहे
  • या योजनेचे खातेदार म्हणून मुलगी हे असणार आहे आणि आई-वडील हे वारसदार असणार आहे
  • मॅच्युरिटीच्या वेळी विम्याची रक्कम ही गुप्त ठेवलेले असते
  • एलआयसी कन्यादान पॉलिसी खरेदी करण्याकरता मुलगी किमान एक वर्षाची असणे अनिवार्य आहे
  • परिपक्वतेच्या वेळेस विमा रक्कम ही कमीत कमी एक लाख रुपये ने अनिवार्य आहे
  • योजनेची मुदत ही प्रीमियम भरणाऱ्या मुदतीपेक्षा तीन वर्ष जास्त असणार आहे
  • या योजनेची पॉलिसी मुदत ही तेरा वर्षे ते पंचवीस वर्षापर्यंत असणार आहे पॉलिसीची मुदत ही 11 वर्षाची जर असेल तर पॉलिसीधारकाला 11 वर्षापर्यंत प्रीमियम भरावा लागणार आहे

या योजनेच्या हप्त्या विषयी माहिती

अ .क्र प्रत्येक दिवसप्रत्येक महिनाप्रत्येक वर्ष25 वर्षापर्यंत भरावी लागणारी रक्कम शेवट मिळणारी रक्कम
0175/- रुपये2250/- रुपये27,000/- रुपये6,75,000/- रुपये14,00,000/- रुपये
02121/- रुपये3630/- रुपये43,560/- रुपये10,89,000/- रुपये27,00,000/- रुपये
LIC Kanyadan Yojana 2024 Chart

                       हे पण नक्की वाचा 

या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

या योजनेसाठी लागणारे मुख्य कागदपत्रे हे खालील प्रमाणे असतील त्यामुळे पालकां कडे हे कागदपत्रे असणे गरजेचे आहे

  • उत्पन्नाचा दाखला
  • ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रीतसर भरलेला तसेच स्वाक्षरी केलेला योजना प्रस्ताव फॉर्म
  • पहिला प्रीमियम भरण्याकरता चेक किंवा रोख
  • मुलीच्या जन्माचा दाखला
  • पालक किंवा कायदेशीर पालकांच्या ओळखीचा पुरावा ( आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार इत्यादी)
  • पालक किंवा कायदेशीर पालक पत्त्याचा पुरावा ( पासपोर्ट, आधार कार्ड इत्यादी)
  • पालकांच्या तसेच कायदेशीर पालकांच्या उत्पन्नाचा दाखला
  • तसेच इतर आवश्यक माहिती

या योजने साठी अर्ज कसा करावा ?

  1. या एलआयसी कन्यादान योजनेसाठी अर्ज हा कशाप्रकारे करायचा आहे त्याची सर्व माहिती ही खाली देण्यात आलेली आहे त्यामुळे ती माहिती तुम्ही काळजीपूर्वक व्यवस्थितपणे वाचा त्यानुसारच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करा
  2. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच असलेल्या एलआयसी ऑफिस मध्ये जाऊन किंवा एलआयसी एजंट कडे जाऊन या योजनेविषयी सर्व माहिती जाणून घ्यायची आहे
  3. सर्व माहिती मिळाल्यानंतर तुम्ही त्या एजंट द्वारे तुमचं अकाउंट ओपन करू शकता
  4. तुमच्या अकाउंट एकदा ओपन झाल्यावरती तुमच्या उत्पन्न नुसार तसेच आवश्यकतेनुसार तुम्ही तुमच्या मुलीची पॉलिसी प्लॅन हा निवडायचा आहे
  5. पॉलिसी प्लान निवडल्यानंतर त्याची सर्व माहिती एकदा समजून घ्यायची आहे जेणेकरून पुढे तुम्हाला कुठलेही अडचण येणार नाही आणि त्या प्लॅन नुसार तुम्ही तुमचा अर्ज सादर करायचा आहे
  6. अर्ज मध्ये पूर्ण माहिती भरल्यानंतर त्यासोबत असलेले सर्व डॉक्युमेंट हे किंवा कागदपत्रे त्या अर्जाला जोडा
  7. तो अर्ज संबंधित एजंट कडे किंवा एलआयसी अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे
  8. अर्ज जमा केल्यानंतरच तुमचा एलआयसी अकाउंट हे तयार होईल आणि तेव्हापासून तुम्हाला या पॉलिसीमध्ये प्रीमियम भरायचे आहे
  9. अशाप्रकारे तुम्ही या पॉलिसीसाठी अर्ज करू शकता

योजनेचा फायदा

एलआयसी कन्यादान पॉलिसी मध्ये गुंतवणूक केल्याने तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित तर होणारच तिच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला टेन्शन राहणार नाही तसेच तुमच्या मुलींना शिक्षण आणि लग्न या जीवनातील विशेष गोष्टी साठी असणारे टेन्शन हे दूर होणार आहे त्यामुळे मी तुमच्या मुलीसाठी ही पॉलिसी नक्की उघडा जेणेकरून तुमच्या मुलीचे भविष्य हे एक विशिष्ट अशा वळणावरती जाऊन पोहोचेल

महत्वाची सूचना 

भारतीय आयुर्विमा महामंडळ आधारे सुरू करण्यात आलेली एलआयसी कल्याण पॉलिसी नावाची अशी कुठलेही प्रकारची योजना ही अस्तित्वात नसून फक्त एलआयसी जीवन लक्ष पॉलिसी ही एक योजना आहे अनेक कंपन्यांनी त्यांची पॉलिसी विकण्यासाठी वापर करण्यात आला आहे एलआयसी कन्यादान पॉलिसी ही पॉलिसी संरक्षण तसेच पालकांचे बचत या दोघांचा विशेष कॉम्बिनेशन आहे ही पॉलिसी तुमच्या कुटुंबातील प्रिय मुलींकरता कमीत कमी प्रीमियम सह आर्थिक कव्हरेज प्रदान करण्यास सक्षम आहे

अधिकृत वेबसाईट

निष्कर्ष 

एलआयसी कन्यादान योजना ही एक केंद्र सरकारने राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली महत्त्वाची सुंदर अशी योजना आहे या योजनेअंतर्गत मुलींना व मुलींच्या पालकांना बऱ्याच गोष्टींसाठी असणारे टेन्शन हे दूर होणार आहे त्यामुळे या योजनेचा मुलींनी व मुलींच्या पालकांनी लाभ घ्यावा

 

 

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading