Table of Contents
Mahatransco Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी Maharashtra State Electricity Transmission Company Limited अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून त्या भरतीची अधिकृत जाहिरात महापारेषण च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध झाली असून त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येते आहे
तरी या भरतीसाठी जे उमेदवार पात्र इच्छुक असतील अशा उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने सादर करावा
Mahatransco Bharti 2024
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये जवळपास 13 पदांसाठी एकूण 4494 जागा या भरण्यात येणाऱ्या ह्या जागा या विविध तेरा पदांमध्ये विभागण्यात आले आहे या पदांच्या आवश्यकतेनुसार महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा
तसे या भरतीसाठी असणारे सर्व माहिती तुम्हाला या पोस्टमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ही पोस्ट काळजीपूर्वक वाचा
यामध्ये भरती संबंधी असलेले शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज शुल्क किंवा पदांची संख्या इत्यादी सर्व गोष्टी अगदी डिटेल मध्ये सांगण्यात आल्या आहेत त्यामुळे तुम्ही ही पोस्ट नक्की वाचा आणि इतरांच्या जर कामाचे असले तर त्यांना पण नक्की शेअर करा या पदभरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दलची सर्विस तर माहिती सुद्धा तुम्हाला या पोस्टमध्ये देण्यात आली आहे
पदांची माहिती
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
1 | कार्यकारी अभियंता (पारेषण) | 25 |
2 | अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) | 133 |
3 | उपकार्यकारी अभियंता (पारेषण) | 132 |
4 | सहाय्यक अभियंता (पारेषण) | 419 |
5 | सहाय्यक अभियंता (दूरसंचार) | 09 |
6 | वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) | 126 |
7 | तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) | 185 |
8 | तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) | 293 |
9 | विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) | 2623 |
10 | सहाय्यक अभियंता (पारेषण) | 132 |
11 | वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) | 92 |
12 | तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) | 125 |
13 | तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) | 200 |
एकूण रिक्त जागा | 4494 |
या भरतीसाठी असणारी पात्रता निकष
वयो मर्यादा
महाराष्ट्र विद्युत परेशन कंपनीमध्ये भरण्यात येणारे विविध पदांसाठी विशिष्ट वयोमर्यादा ठरवण्यात आलेली असून ती वयोमर्यादा पदांनुसार ही वेगवेगळी असून ती प्रत्येक पदासाठी खालील प्रमाणे असेल
- त्यामध्ये कार्यकारी अभियंता पारेषण आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता पारेषण या दोन पदांसाठी वयोमर्यादा ही अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्षे पूर्ण असावे
- आणि उपकार्यकारी अभियंता पारेषण, सहाय्यक अभियंता पारेषण, सहाय्यक अभियंता दूरसंचार, वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली , तंत्रज्ञ -1 पारेषण प्रणाली, तंत्रज्ञ- 2 पारेषण प्रणाली, आणि विद्युत सहाय्यक पारेषण प्रणाली या पदांकरिता उमेदवारांचे वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षे पूर्ण असावे
- आणि सहाय्यक अभियंता पारेषण , वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली , तंत्रज्ञ-1 पारेषण प्रणाली ,आणि तंत्रज्ञ-2 पारेषण प्रणाली या पदांसाठी वयोमर्यादा ही उमेदवाराचे वय हे जास्तीत जास्त 57 वर्षापर्यंत असेल
शैक्षणिक पात्रता
- कार्यकारी अभियंता (पारेषण) : या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे BE किंवा B.Tech (Electrical) झालेले असावे आणि त्याला 09 वर्षे काम केल्याचा अनुभव असणे गरजेचे आहे किंवा त्याला अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.काम केल्याचा अनुभव असणे अनिवार्य आहे
- अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) : या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे BE/B.Tech (Electrical) झालेले असावे आणि त्याला 07 काम केल्याचा अनुभव असणे गरजेचे आहे किंवा त्याला अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.काम केल्याचा अनुभव असणे अनिवार्य आहे
- उपकार्यकारी अभियंता (पारेषण) : या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे BE/B.Tech (Electrical) झालेले असावे आणि त्याला पॉवर ट्रान्समिशनचा कामचा 03 वर्षांचा अनुभव असावा
- सहाय्यक अभियंता (पारेषण) : या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे BE/B.Tech (Electrical) झालेले असावे
- सहाय्यक अभियंता (दूरसंचार) : या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे BE/B.Tech (Electronics & Telecommunication) झालेले असावे
- वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) : या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार आणि त्यांना 06 वर्षे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे
- तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) :या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार आणि त्याला 04 वर्षे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे
- तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) : या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. आणि त्याला 0२ वर्षे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे
- विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) : या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.
- सहाय्यक अभियंता (पारेषण) : या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण असावे आणि त्याला कामाचा 05 वर्षे अनुभव असणे अनिवार्य आहे किंवा तो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हि पदवी उत्तीर्ण असावा
- वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली): या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार आणि त्याला 0६ वर्षे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे
- तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) : या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार आणि त्याला 04 वर्षे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे
- तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) : या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. आणि त्याला 0२ वर्षे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे
या भरती साठी अर्ज कसा करावा?
- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये होणाऱ्या पदभरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
- सर्वप्रथम खाली देण्यात आलेल्या अर्ज येथून करा या शब्दावरती क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घ्या किंवा नोंदणी करा
- नोंदणी केल्यावरती लॉगिन करा लॉगिन झाल्यावर तुम्हाला कोणत्या पोस्ट साठी फॉर्म भरायचा आहे ते तुम्ही निवडा तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म ओपन होईल त्या फॉर्ममध्ये तुमची असलेली सर्व माहितीही व्यवस्थित रित्या भरून घ्या
- माहिती भरल्यानंतर तुम्हाला विहित केलेल्या कागदपत्रे हे स्कॅन करून अपलोड करून द्या
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला अकारण्यात आलेली फी ही भरा
- ती भरल्यावर सबमिट केला जाणार आहे
- सर्वात शेवट म्हणून तुम्ही तुमचा अर्ज व्हेरिफाय करून सबमिट करून द्या
- अशाप्रकारे तुमचा ऑनलाइन पद्धतीने तुम्ही भरू शकता
- तुमचा अर्ज सादर करण्या अगोदर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात ही एकदा नक्की वाचा
स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध पदांच्या 17,727 जागांची होणार महा भरती
Mahatransco Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात कार्यकारी अभियंता (पारेषण) या पदाची | येथे पहा |
PDF जाहिरात अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) या पदाची | येथे पहा |
PDF जाहिरात उपकार्यकारी अभियंता (पारेषण) या पदाची | येथे पहा |
PDF जाहिरात सहाय्यक अभियंता (पारेषण) , सहाय्यक अभियंता (दूरसंचार) या पदाची | येथे पहा |
PDF जाहिरात वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) , तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) ,तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) या पदाची | येथे पहा |
PDF जाहिरात विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) या पदाची | येथे पहा |
PDF जाहिरात सहाय्यक अभियंता (पारेषण) या पदाची | येथे पहा |
PDF जाहिरात वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) , तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) या पदाची | येथे पहा |
ऑनलाईन अर्ज | येथून अर्ज करा |
अर्ज फी
- यामध्ये अर्ज शुल्क हे पुढील प्रमाणे असतील
- कार्यकारी अभियंता पारेषण, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पारेषण , उपकार्यकारी अभियंता पारेषण, सहाय्यक अभियंता पारेषण , सहाय्यक अभियंता दूरसंचार या सर्व पदांसाठी अर्ज शुल्क साधारण प्रवर्गासाठी 700/- रुपये असेल आणि मागासवर्गीय साठी 350/- रुपये असतील
- तसेच वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली ,तंत्रज्ञ-1 पारेषण प्रणाली , तंत्रज्ञ-2 पारेषण प्रणाली यासाठी अर्ज शुल्क आहे साधारण प्रवर्गासाठी 600/- रुपये असतील आणि मागासवर्गीयांसाठी 300/- रुपये असतील
- विद्युत सहाय्यक पारेषण प्रणाली या पदासाठी अर्ज शुल्क हे साधारण प्रवर्गासाठी 500/- रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 250/- रुपये असतील
- सहाय्यक अभियंता पारेषण या पदासाठी अर्ज शुल्क हे साधारण प्रवर्गासाठी 700/- रुपये असेल आणि मागासवर्गीयांसाठी 350/- रुपये असतील
- वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली , तंत्रज्ञ-1 परेशान प्रणाली, तंत्रज्ञ-2 पारेषण प्रणाली या पदासाठी अर्ज शुल्क हे साधारण प्रवर्गासाठी 600/- रुपये असेल आणि मागासवर्गीयांसाठी 300/- रुपये असतील
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.