Balika Samridhi Yojana 2024: तुमच्या मुलींसाठी सरकारची उत्तम योजना, मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत सरकार देणार आर्थिक मदत, लगेच करा नोंदणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

Balika Samridhi Yojana 2024 : नमस्कार केंद्र सरकार आणि आपले असणारे राज्य सरकार हे आपल्या देशातील मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी तसेच त्यांना उत्तम प्रकारचे शिक्षण मिळावे यासाठी आपले सरकार हे वेगवेगळ्या योजना राबवत असतात

त्यातलीच एक योजना म्हणजे बालिका समृद्धी योजना या योजनेमध्ये सरकार आपल्याला मुलीच्या जन्मापासून ते मुलीच्या उच्च शिक्षणापर्यंत दरवर्षाला आर्थिक मदत प्रदान करणारा आहे किसी या योजनेची सर्व माहिती तुम्हाला या आर्टिकल मध्ये बघायला मिळणार या बालिका समृद्धी योजनेबद्दल सांगायचं ही योजना ची सुरुवात 1997 साली सुरु सुरू करण्यात आली असून ही योजना महिला व बालविकास विभाग यांच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली अत्यंत सुंदर अशी योजना आहे या योजनेचा फायदा हा 1997 नंतर ज्या मुलींचा जन्म झाला आहे त्या मुलींना त्या योजनेचा फायदा घेत आहे ही योजना प्रामुख्याने जे कुटुंब हे दारिद्र्यरेषेखालील कुटुंब आहे

या योजनेची माहिती

अशा कुटुंबातील मुलींसाठी ही योजना खास करून सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या अनुषंगाने या गरीब कुटुंबातील मुलींना सरकारकडून शिक्षणासाठी दरवर्षाला आर्थिक मदत दिली जाते बालिका समृद्धी योजना या योजने च्या अनुषंगाने मुलीच्या जन्माच्या वेळी मुलीच्या आईला आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपये देण्यात येते आणि मुलगी मोठी झाल्यानंतर

म्हणजे जेव्हा मुलगी दहावीमध्ये प्रवेश करेपर्यंत त्या मुलीला दरवर्षीप्रमाणे ठरवून दिलेल्या रक्कम ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या अधिपत्याखाली मिळते जी देण्यात येणारी रक्कम आहे त्या रकमेमुळे त्या मुलींना त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात आणि प्रशिक्षण साठी पुढे जा ण्याचे प्रोत्साहन देण्याचे काम ह्या योजनेद्वारे करण्यात आले आहे जर तुमच्या इथे पण मुलीचा जन्म हा 1997 च्या आधी असेल तर अशा मुलींसाठी ही सरकारकडून एक उत्तम अशी योजना आहे त्या योजनेचा तुम्ही पण लाभ घेऊ शकता या योजनेची असणारी सर्व माहिती जसे की या योजनेसाठी कोण पात्र आहे या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा व इतर सर्व माहिती तुम्हाला खाली या आर्टिकल मध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे हे आर्टिकल तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा

Balika Samridhi Yojana 2024 Details

बालिका समृद्धी योजना ही खास भारत देशातील मुलींसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे ही योजना  1997 मध्ये महिला व बालविकास विभाग अंतर्गत सुरू करण्यात आली असून तसेच या योजनेमध्ये 15 ऑगस्ट1997 नंतर ज्या मुलींचा जन्म झालेला आहे त्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेसाठी शहरी आणि ग्रामीण भागातील दोन्ही भागातील मुली ज्या मुली ह्या आर्थिक दुर्बल घटक म्हणजे दारिद्र रेषेखालील कुटुंबात जन्मलेल्या आहे अशा मुलींना या योजनेचा फायदा घेता येणार आहे किंवा या योजनेचा लाभ त्या मुलींना मिळणार आहे
बालिका समृद्धी योजना ही भारत सरकार द्वारा देशातील मुलींसाठी मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत प्रदान करते ही योजना केंद्र सरकारच्या श्रेणीमध्ये येते आणि या योजनेसाठी आपण अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे अर्ज कसा करायचा हे तुम्हाला पुढे या पोस्टमध्ये बघायला मिळणार आहे

Balika Samridhi Yojana अधिकृत वेबसाईट 

बालिका समृद्धी योजनेमार्फत मुलींना कश्या पद्धतीत लाभ मिळतो ?

  • इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरी पर्यंत दरवर्षी मुलींना 300/- रुपये  आर्थिक मदत मिळणार
  • इयत्ता चौथी मधील मुलींना दर वर्षी 500/-  रुपये आर्थिक मदत  मिळणार
  • इयत्ता पाचवी तील मुलींना दरवर्षी 600/-  रुपये आर्थिक मदत मिळणार
  • इयत्ता सहावी आणि सातवी तील मुलींसाठी दरवर्षी 700/- रुपये आर्थिक मदत मिळणार
  • इयत्ता आठवी तील मुलींसाठी दरवर्षी 800/- रुपये आर्थिक मदत मिळणार
  • इयत्ता नववी आणि दहावी मधील मुलींसाठी दरवर्षी 1000/-  रुपये आर्थिक मदत मिळणार

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा जर तुम्हाला फायदा घेयायचा जर असेल तर तुम्हाला खालील कागदपत्रे आवश्यक असणार आहे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक खाते पासबुक
  • पालकांचे ओळखपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते तपशील
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • शाळेत प्रवेश घेतलेला दाखला
  • अर्जात नमूद केलेले मुलीचे शैक्षणिक कागदपत्रे ई

या योजनेचे असणारे फायदे

  • बालिका समृद्धी योजनेचा फायदा हा फक्त मुलींसाठीच असणार आहे म्हणजे या योजनेअंतर्गत जेव्हा मुलीचा जन्म होईल त्यावेळी पासूनच या योजनेचा  लाभ घेता येणार आहे
  • म्हणजेच मुलीच्या जन्माच्या वेळेस मुलीच्या आईला या योजनेअंतर्गत रुपये 5000/- ची आर्थिक मदत दिली जाणार आहे
  • आणि त्यानंतर मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी 300/- रुपये पासून ते 1000/- रुपये पर्यंत दरवर्षाला शिष्यवृत्ती स्वरूपात ही मदत दिली जाणार आहे
  • आणि विशेष बाब म्हणजे या योजनेअंतर्गत मुलींना जर पुढील उच्च स्तराचे शिक्षण घ्यायचा असेल तर या उच्च शिक्षणासाठी कर्ज सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे
  • आणि या घेण्यात येणाऱ्या कर्जाला कमी व्याजदर असणार आहे आणि त्या मुली स्वतःच्या व्यवसाय करून सुद्धा या योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकणार आहे
  • या योजनेअंतर्गत मुली ह्या स्वतःच्या पायावरती उभे राहण्यास मदत होणार आहे
  • सरकारच्या योजनेमुळे मुलींना उच्च शिक्षण तसेच व्यवसाय करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे

या योजनेसाठी असणारी पात्रता निकष 

  • या योजनेसाठी पात्रता पुढील प्रमाणे असेल
  • या योजनेसाठी फक्त मुलीच ह्या पात्र असणार आहे
  • या योजनेअंतर्गत असणाऱ्या मुलींचा जन्म हा भारतामध्ये झालेला असावा
  • या योजनेसाठी फक्त आणि फक्त मुली ह्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे
  • भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार ज्या कुटुंबाकडे दारिद्र्यरेषेखाली कुपन आहे असेच कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे किंवा या योजनेसाठी त्याच मुली पात्र ठरणार आहे
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म हा 15 ऑगस्ट 1997 किंवा 1997 नंतरच झालेला असावा 1997 त्याआधी जन्म झालेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  •  जर एकाच कुटुंबात दोन पेक्षा जास्त मुली असतील तर त्या कुटुंबातील फक्त दोनच मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे

या योजनेसाठी अर्ज हा कसा करावा ?

  1. बालिका समृद्धी योजनेसाठी अर्ज हा तुम्हाला दोन्ही पद्धतीने म्हणजे ऑनलाईन पण आणि ऑफलाइन पण करता येणार आहे
  2. योजनेसाठी जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर अर्ज करायचा असेल तर तुमच्या जवळच असलेल्या सीएससी सेंटर ( कस्टमर सर्विस सेंटर ) किंवा महा-ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता
  3. आणि जर तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही कोणत्या भागात राहतात याच्यावरती अवलंबून असणार आहे
  4. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला तुमच्या जवळच असलेल्या अंगणवाडी केंद्रातून हा फॉर्म घ्यायचा आहे आणि तो फॉर्म भरून अंगणवाडीत जमा करायचा आहे
  5. आणि जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला तुमच्या जवळच असलेल्या आरोग्य केंद्रातून या योजनेचा अर्ज घ्यावा लागणार आहे आणि तो भरून पुन्हा तिथे जमा करावा लागणार आहे
  6. एक लक्षात असू द्या योजनेसाठी शहरी भागातील अर्ज आणि ग्रामीण भागातील अर्ज हे पूर्णपणे वेगवेगळे असणार आहेत
  7. आपल्याला जर स्वतः जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही वरती दिलेल्या संबंधित कार्यालयातून अर्ज घेऊन जाऊ शकता आणि तो अर्ज भरून संबंधित कार्यालय तुम्ही अर्ज जमा करू शकता

योजनेसाठी असणारे काही नियम

  • या योजनेअंतर्गत प्राप्त होणारी रक्कम ही मुलीच्या खात्यात डायरेक्ट वर्ग करण्यात येणार आहे
  • जर एखाद्या मुलीचा मृत्यू जर अठरा वर्ष ्याच्या आधी जर झाला तर तिच्या खात्यामध्ये जेवढी पण रक्कम शिल्लक असेल ती रक्कम तिच्या पालकांना काढण्यात येणार आहे
  • जर एखाद्या मुलीचे लग्न हे अठरा वर्षाच्या आत जर झाले तर तिला या योजनेचा पुढील लाभ घेता येणार नाही
  • या योजनेचा लाभ फक्त या अविवाहित मुलीच घेऊ शकतात विवाहित मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यासाठी एक प्रमाणपत्र त्यांना ग्रामपंचायत मधून सादर करावे लागते
  • जेव्हा मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण होईल तेव्हा ती मुलगी तिच्या खात्यात असणारी रक्कम ही तिला काढता येणार आहे

निष्कर्ष

बालिका समृद्धी योजना या योजनेबद्दल आपण या आर्टिकल मध्ये सर्विस तर पणे माहिती दिलेली आहे भारत सरकार द्वारा ही एक अत्यंत सुंदर अशी योजना आहे त्यामुळे तुम्ही या योजनेचा नक्कीच फायदा घ्यावा
आणि जर माहिती जर कामाची जर असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा

या योजनेबद्दल पण वाचा

LIC Kanyadan Yojana 2024

 

 

 

 

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading