PM Kisan Yojana 17th Installment: उद्या 18 जून 2024 रोजी पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

 

PM Kisan Yojana 17th Installment : नमस्कार शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या म्हणजेच 18 जून 2024 रोजी 17 वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यावरती जमा करण्याची प्रोसेस सुरू होणार आहे

या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 18 जून 2024 रोजी पी एम किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता हा शेतकऱ्यांसाठी जारी करणार आहे पंतप्रधान मोदी यांच्या अधिपत्याखाली देशातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येक 2000/- रुपयांचे हप्ते हे वर्ग करणार आहे यामध्ये 20 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे तशी या सतराव्या हप्त्यासाठी केंद्राकडून 20 हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे

पीएम किसान योजना – 17 वा हप्ता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून एक सुंदर अशी निधी योजना सुरू करण्यात आली आहे त्याचे जवळपास 16 हप्ते हे पूर्ण झाले असून तर उद्या म्हणजे 18 जून 2024 तारखेला 17 वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून वर्ग होणार आहे प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत दरवर्षाला शेतकरी कुटुंबांसाठी जे लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांना 6000/- रुपये असे हे तीन टप्प्यात दिले जातात त्यामध्ये चार महिने मिळून ही निधीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले जाते

पी एम किसान योजने त लाभार्थ्यांन EKYC करणे अनिवार्य आहे ही EKYC जर केले नसेल तर तुमचा सतरावा हप्ताह तुमच्या खात्यात वर्ग होणार नाही त्यामुळे तुमचे खात्याला केवायसी केलेले आहे की नाही याची खात्री करून घ्यावी आणि नसेल केले तर केवायसी करून घ्यावी

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना च्या नोंदणी ग्रुप लाभार्थ्यांना शेतकऱ्यांसाठी पी एम किसान ई केवायसी करणे हे अनिवार्य आहे तशी नोटिफिकेशन प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आले आहे

PM Kisan Yojana 17th Installment

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत उद्या दिनांक 18 जून 2024 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेतील 17 व्या हप्त्याचे वितरण करणार आहेत या कार्यक्रमादरम्यान बरेच लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद सुद्धा साधणार असून ते राष्ट्राला संबंधित करणार आहे आणि पुढील योजनांविषयी काही माहिती देणार आहे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची माहिती

पी एम किसान सन्मान निधी या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिपत्याखाली सुरू करण्यात आली आहे ही योजना सन 2019 रोजी सुरू करण्यात आली असून तेव्हापासून ते आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 16 हप्ते हे देण्यात आले आहे आणि 17 वा हप्ता हा उद्या पासून शेतकऱ्यांच्या खात्यात अदा करण्यात येईल

योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबाला दरवर्षी 6,000/- रुपये इतका निधी दिला जातो हा निधी तीन समान महिन्याअंतर्गत लाभार्थ्याच्या बँक खात्यात वर्ग केला जातो
जर आपल्याला पंतप्रधान किसान सन्मान योजना  यादीमध्ये आपले नाव जर बघायचे असल्यास तशी या सरकारने नवीन ऑनलाइन सुविधा सुरू करण्यात आली असून त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव बघू शकता
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2024 ची यादी अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून ती तुम्हाला खाली लिंकद्वारे बघावयास मिळणार आहे

या योजनेतील EKYC संदर्भातील माहिती 

पी एम किसान योजना यासाठी EKYC हे अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त असे साधन आहे EKYC जर नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी EKYC  लगेच करून घ्यावी  EKYC करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटला विजिट करावे लागेल यादरम्यान तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे त्यानुसार सगळे EKYC ची प्रोसेस आहे

EKYC कशी करावी ?

  1. या योजनेसाठी लाभार्थ्याला केवायसी कसे करायचे यात आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत
  2. सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे तिथे गेल्यावर ती तुमच्यासमोर होमपेज ओपन होईल
  3. त्या होम पेज वरती शेतकरी कॉर्नर या नावाचा विभाग असणार आहे त्यात त्यावर तुम्ही क्लिक करायचे व त्यामध्ये बरेच पर्याय उपलब्ध असतील त्यापैकी ” इ केवायसी ” या पर्यायी वरती क्लिक करायचे आहे
  4. त्या पर्यायावर क्लिक केल्यावर ती पुढे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकण्यासाठी एक बॉक्स येईल त्या बॉक्समध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर टाकायचा आहे
  5. त्यानंतर तेथील असलेल्या सर्च या बटणावर क्लिक करायचे आहे
  6. तुमचा मोबाईल नंबर टाकण्यासाठी एक बॉक्स येईल तुमचा मोबाईल नंबर टाका आणि मोबाईल ओटीपी (Mobile OTP) या बटणावर क्लिक करा
  7. तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक असल्यास त्या नंबर वरती एक ओटीपी मेसेज येईल आलेला ओटीपी हा पुढे बॉक्समध्ये टाका आणि सबमिट ओटीपी (Submit OTP)  यावर क्लिक करा
  8. पुढे गेट आधार ओटीपी (Get Addhar OTP) या बटनावर क्लिक करा तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ची लिंक केलेला मोबाईल नंबर वरती आणखी एक ओटीपी येईल तो ओटीपी पुढे टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा
  9. Consent Given या बॉक्समध्ये टिकमार्क करा आणि सबमिट करा तुमच्या स्क्रीनवर इ केवायसी सक्सेसफुली पूर्ण झाले असा मेसेज दिसेल
  10. अशाप्रकारे तुम्ही तुमची इ केवायसी ही व्यवस्थित रित्या करू शकता

पी एम किसान योजनेत EKYC  करण्यासाठी येथे क्लिक करा

पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी कशी पाहवी 

  • एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक केल्यावर पाहू शकता ती कशी पाहिजे ते आपण स्टेप बाय स्टेप बघू
  • सर्वात प्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचे आहे त्यात तुमच्या समोर पी एम किसान योजनेचे पेज ओपन होईल
  • त्या पेज मध्ये खाली बेनिफिशियल लिस्ट म्हणून ऑप्शन असेल
  • त्याखाली आपण आपले राज्य निवडायचे त्याच्यापुढे आपला जिल्हा निवडायचा व त्यापुढे आपला तालुका निवडायचा व त्यापुढे आपला ब्लॉक निवडायचा त्या पुढे आपले गाव निवडायचे हे पूर्ण निवडल्यानंतर गेट रिपोर्ट ( Gate Report ) या बटणावरती क्लिक करायचे
  • त्या बटनावरती क्लिक केल्यावरती तुमच्यासमोर तुमच्या गावाची लिस्ट ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव बघू शकता

    पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी  पाहण्यासाठी येथे क्लिक करा

योजने साठी लागणारे आवश्यक कागतपत्रे

  • बँक खाते
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड
  • मोबाइल नंबर
  • खाते क्रमांक
  • खटौनी क्रमांक

पी एम किसान योजनेत नवीन नोंदणी कशी करावी

  • तुम्ही जर पीएम किसान सन्मान योजना साठी ऑनलाईन अर्ज सादर केला नसेल तर तो अर्ज अतिशय सोप्या पद्धतीने सादर करू शकता तो अर्ज कसा सादर करायचा हे खालील प्रमाणे असेल
  • प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जा वेबसाईट वरती गेल्यावर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल ओपन झाल्यावरती तिथे कोपऱ्यात ” नवीन शेतकरी ” म्हणून या पर्यायावर क्लिक करा
  • या पर्यायी वरती क्लिक केल्यावरती तुमच्या समोर नवीन एक पेज ओपन होईल त्यात तुम्हाला दोन पर्याय दिसतील एक ग्रामीण शेतकरी नोंदणी आणि शहरी शेतकरी नोंदणी या दोन्हीपैकी तुम्ही ज्या भागात राहता तो भाग तुम्ही निवडा
  • तो भाग निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्या पेज वरती तुमचा ( आधार नंबर / मोबाईल नंबर / राज्य आणि तुम्हाला देण्यात आलेला कॅपच्या )  टाका या सर्व गोष्टी टाकल्यावरती सेंड ओटीपी SEND OTP या बटणावर क्लिक करा
  • या बटणावर क्लिक केल्यावर  तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल वरती तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्ही पुढे टाका आणि सबमिट करा
  • सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर पीएम किसान नोंदणी फॉर्म ओपन होईल
  • तो फॉर्म तुम्ही एकदा व्यवस्थितपणे वाचून घ्या आणि त्यात जी माहिती विचारली ती एकदम व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक भरा
  • व माहिती भरल्यानंतर तुम्हाला जे कागदपत्र अपलोड करण्यास सांगितले आहे ते कागदपत्र अपलोड करून द्या आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा
  • सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक किसान आयडी प्राप्त होईल आणि तुम्ही टाकलेल्या माहिती काही दिवस ही व्हेरिफाय केली जाईल
  • त्यानंतर तुमचे नाव पी एम किसान लाभार्थी यादीमध्ये टाकण्यात येईल
  • अशाप्रकारे तुम्ही पी एम किसान योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करू शकता

    पी एम किसान योजनेत नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेची पण माहिती बघा

1)  PM Vishwakarma Yojana 2024: पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज सुरु
2) PM Surya Ghar Yojana 2024: Apply Online, प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी अर्ज करा

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

1 thought on “PM Kisan Yojana 17th Installment: उद्या 18 जून 2024 रोजी पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading