Table of Contents
Mukhyamantri Solar Pump Yojana 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकार द्वारा शेतकऱ्यांसाठी भरपूर साऱ्या योजना राबवण्यात येते त्यातलीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री सोलार पंप योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी असलेली सिंचनाची सुविधा ही सोप्या पद्धतीने व्हावी आणि शेतकऱ्यांना कुठलाही विद्युत उपकरणावरती अवलंबून राहता येऊ नये
विशेषतः शेतकऱ्यांना असलेल्या विद्युत प्रवाह वरती अवलंबून राहू नये आणि शेतीच्या सिंचनाची कामेही झटपट आणि सोप्या पद्धतीने व्हावी या हेतूने ही योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
मुख्यमंत्री सोलर पंप योजना Mukhyamantri Solar Pump Scheme अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरकारद्वारे एक लाख सौर पंप वाटप करण्याचा सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून या योजनेला अटल सौर कृषी पंप योजना या नावाने सुद्धा ओळख निर्माण करून दिली आहे
मुख्यमंत्री सौर पंप योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना नवीन सौर कृषी पंप बसवण्यासाठी विशिष्ट प्रकारे अनुदान मिळणार आहे तसेच जुने असणारे जे पंप या पंपांना सुद्धा महाराष्ट्र सरकार द्वारा सौर पंप मध्ये रूपांतरित करण्यात येणार
मुख्यमंत्री सौर पंप योजना हेतू
मुख्यमंत्री सौर पंप योजना अंतर्गत सौर पंप खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना विशिष्ट प्रमाणात अनुदान मिळणार आहे तसेच महाराष्ट्र राज्यातील जुने पंप आणि इलेक्ट्रिक कंपनीचा वापर अजूनही भरपूर प्रमाणात होत असून या दोन्ही पंपांमध्ये खूप खर्च येतो आणि त्यांना टाइमिंगनुसारच तुमचा काम करावे लागते शेतकरी बांधवांना सौर पंपाचा जर वापर केला तर त्यांना एकच वेळेस इन्व्हेस्टमेंट करून बऱ्याच काळ या सौर पंपाचा उपयोग करता येणार आहे
सौर कृषी पंप योजना 2024 काय आहे फायदे
- सौर कृषी पंप योजनेचा फायदा हा फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असणार आहे
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सौर पंपा पासून शेतकऱ्यांना रानामध्ये सिंचन करण्याचे काम हे विशिष्ट काळातच होणार आहे
- म्हणजे शेतकऱ्यांना अहो रात्री पाणी भरण्यासाठी जाण्याची गरज राहणार नाही
- त्यामुळे शेतकऱ्यांचे सुरक्षा मध्ये खूप प्रमाणात वाढ होणार आहे
- शेतीचे सिंचनाचे काही जे काम असेल ते तुम्ही फक्त या योजनेमुळे शेतकरी दिवसा करणार
- सौर कृषी पंप योजना मुळे शेतात असलेले लाईटचे सुद्धा गरज पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना लोड शेडिंग चा त्रास सुद्धा सहन करावा लागणार नाही
- आणि शेतकऱ्यांना हवे त्या आणि आपल्या मोकळ्या वेळेत शेतीचे सिंचनाचे काम करता येणार आहे
- कुठल्याही प्रकारच्या विद्युत उपकरणावरती अवलंबून राहता येणार नाही आणि लाईटच्या टायमिंगचा सुद्धा यामध्ये काही विषय राहणार नाही
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना जेव्हा वाटेल तेव्हा तो शेतीसाठी त्याची सौर कृषी पंप चालू करून पाणी भरू शकतो
- यामुळे रात्री अहो रात्री पाणी भरण्याचे टेन्शन हे शेतकऱ्याचे दूर होणार आहे
- अटल सौर कृषी पंप योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकार हे पहिल्या टप्प्यात जवळपास 25000 सौर पंपांचा वाटप करणार असून तसेच दुसऱ्या टप्प्यात 50000 पेक्षा जास्त सौर पंपांचा वाटप करण्यात येणार आहे
- आणि तसेच तिसऱ्या टप्प्यांमध्ये महाराष्ट्र सरकार द्वारा 25000 सौर पंपांचा वाटप हा करणार आहे
- हे सर्व टप्पे मिळून जवळपास 1,00,000 सौर पंप या योजनेअंतर्गत वाटप करणार आहे.
Mukhyamantri Solar Pump Yojana 2024 योजनेसाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे
अटल सौर कृषी पंप योजना अंतर्गत जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला खालील कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी फॉर्म भरायचा असेल अशा शेतकऱ्यांनी खालील दिलेले कागदपत्रे आपल्या सोबतच ठेवावी
- आधार कार्ड .
- ओळखपत्र
- शेतीची कागदपत्रे ( 7/12, 8 – अ )
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- इत्यादी
मुख्यमंत्री सौर पंप या योजने साठी अर्ज हा येथून करा
मुख्यमंत्री सौर पंप योजना 2024 Apply Online
मुख्यमंत्री सौर पंप योजना 2024 या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे तो ऑनलाइन अर्ज हा खाली देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे अर्ज करता येईल
- मुख्यमंत्री सौर पंप योजना साठी अर्ज करण्यासाठी त्यांच्या खाली देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
- त्यांच्या असलेल्या होम पेज वरती यावे लागेल
- त्या असलेल्या होमपेज वरती तुम्हाला विविध पर्याय दिसतील या पर्याय पैकी तुम्हाला न्यू कॉंसुमेर New Consumer हा पर्याय निवडायचा आहे
- तो पर्याय निवडल्यावर त्यावर क्लिक करायचे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक अर्ज ओपन होईल तो अर्ज म्हणजे तुमच्या योजनेचा अर्ज असणार आहे
- तो अर्ज तुम्ही व्यवस्थित रित्या भरायचा आहे त्याच विचारलेले संपूर्ण माहिती ही व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक बरोबर भरायचे आहे
- त्याचबरोबर माहिती भरून झाल्यावरती त्या अर्ज सोबत असणारे काही महत्त्वाचे कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागतील
- ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून द्यावे लागतील
- सर्व प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज खाली देण्यात आलेल्या सबमिट या बटनावर क्लिक करून तो अर्ज सबमिट करून द्यायचा आहे
- अशाप्रकारे तुमचा असणारा अर्ज हा मुख्यमंत्री सौर पंप योजना च्या हार्दिक शुभेच्छा सरकारकडे जमा होणार आहे
- अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करू शकता
- तुम्हाला जर घरून ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या असलेल्या सीएससी सेंटर वरती जाऊन या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घेऊ शकता
सौर कृषी पंप योजने चे पात्रता निकष
सौर कृषी पंप योजना 2024 योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना काही विशिष्ट प्रमाणात पात्रता निकष ठरवण्यात आलेले आहेत जर या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर त्याला दिलेला पात्रता निकष हे पूर्ण करावे लागणार
- या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे अनिवार्य आहे
आणि त्याचा व्यवसाय हा शेती असावा - या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना घेता येणार आहे
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे पाण्याचा असलेला उत्तम स्रोत हा पाहिजे
- शेतकऱ्याच्या शेतामध्ये किमान विहीर किंवा बोर हे पाण्याचे स्रोत असणे अनिवार्य आहे
- जुन्या पद्धतीने वीज जोडणी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या मुख्यमंत्री सौर पंप योजनेचा लाभ घेता येणार नाही
- अर्जदार शेतकऱ्यांना यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा
- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावरती शेती जमीन ही असावी
महत्वाच्या योजना
शेतकऱ्यांना सरकार द्वारे मिळणार मोफत कुट्टी मशीन
PM Awas Yojana 2024: या योजने अंतर्गत लाभार्त्याला मिळणार 2.50 लाख रुपये
मुख्यमंत्री सौर पंप योजना अधिकृत माहिती
मुख्यमंत्री सौर पंप योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी योजना असून ही योजना महाराष्ट्र सरकार द्वारा 01 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत बरेच शेतकऱ्यांनी लाभ पण घेतला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी वरील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून या योजनेचा फायदा घेऊ शकता
मुख्यमंत्री सौर पंप योजनेचे उद्देश्य एवढेच आहे की राज्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून देणे आहे
महाराष्ट्र सरकारने आत्ताच केलेल्या घोषणे नुसार जवळपास एक लाख शेतकऱ्यांना विद्युत पंप घेण्यासाठी अनुदानाची वाटप करणार आहोत ही वाटप तीन टप्प्यांमध्ये होणार आहे
Note
मुख्यमंत्री सौर पंप योजना अंतर्गत आणि फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे
या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती तीन एकर पेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना 03 HP ची सौर कृषी पंप देण्यात येणार आहे
आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती तीन एकरापेक्षा जास्त जमीन आहे म्हणजे पाच एकर पर्यंत जमीन आहे अशा शेतकऱ्यांना 05 HP ची सौर पंप देण्यात येणार आहे
आणि ज्या
आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल अशा शेतकऱ्यांना 07 HP ची सौर ऊर्जा पंप देण्यात येणार आहे
Discover more from aaplesarkarjob.com
Subscribe to get the latest posts sent to your email.