PCMC Mahanagarpalika Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 201 जागांची निघाली भरती

PCMC Mahanagarpalika Bharti 2024: आरोग्य विभाग काम करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक प्रकारची चांगलीच संधी आहे ती संधी म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर या सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Organization) यामधील पंधराव्या वित्त आयोगामार्फत नव्याने मंजुरी देण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी नवीन व विविध जागांसाठी रिक्त पदे भरण्यात येणार असून या विविध पदांकरिता उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

या पदाच्या भरती करता जे उमेदवार बारावी उत्तीर्ण व या पदासंबंधी असणारी असणारी शैक्षणिक पात्रता ही ज्या उमेदवाराकडे असेल त्या उमेदवाराला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभाग अंतर्गत काम करण्याची उत्तम अशी संधी मिळणार आहे त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहे अशा उमेदवारांनी या संधीचा पूर्णपणे फायदा घ्यावा
तशी या पदांची जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार उमेदवारांनी आपला अर्ज विहित केलेल्या पत्त्यावरती ऑफलाइन पद्धतीने सादर करावा

PCMC Mahanagarpalika Bharti 2024 भरती बद्दलची माहिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या आरोग्य विभागामध्ये होणारे पदाच्या भरतीमध्ये ( वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक ) या तीन पदांसाठी ही विशेष भरती होणार आहे विशेष म्हणजे या तिन्ही पदांकरिता जवळपास 201 जागांची भरती होणार आहे या भरती संबंधी असणारी अधिक माहिती आपण खाली बघणार आहोत त्यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा कोणत्या पदासाठी किती उमेदवार या सर्व गोष्टी आपण खाली या आर्टिकल मध्ये बघणार आहोत त्यामुळे हे आर्टिकल तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा ही भरती पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका द्वारे करण्यात येणार आहे यामध्ये सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची चांगली व उत्तम संधी उमेदवारांना प्राप्त झाली आहे या भरतीसाठी राज्य सरकार स्टेट गव्हर्मेंट महाराष्ट्र अंतर्गत भरती होणार आहे

भरतीची पात्रता निकष

या भरती करता जे काही पात्रता निकष असतील ते पुढील प्रमाणे असतील

  पदाचे नाव शैक्षणिक पात्रता निकष

 1) वैद्यकीय अधिकारी :- 
  1.  वैद्यकीय अधिकारी या पदासाठी उमेदवार हा एमबीबीएस( MBBS) पदवी किंवा बी ए एम एस (BAMS) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्याच्याकडे इंडियन मेडिकल कौन्सिल किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये उमेदवाराची नोंदणी झालेली आवश्यक आहे
  2. विशेष म्हणजे एमबीबीएस ज्या उमेदवारांचं असेल त्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल
  3. उमेदवाराला अनुभव पण असणे गरजेचे आहे तो अनुभव हा मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन झाल्या पासून चा अनुभव असल्यास ते उमेदवाराला प्रथम प्राधान्य देईल 
2) स्टाफ नर्स :-  
  1.  स्टाफ नर्स या पदाकरता उमेदवार हा 12 वी पास असणे आवश्यक आहे
  2.  व त्याने जीएनएम (GNM) किंवा बीएससी नर्सिंग (BSc Nursing) यामध्ये तो उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  3. व त्याची महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडे नोंदणी असणे गरजेचे आहे
  4. ज्या उमेदवाराला स्टाफ नर्स या कामाचा अनुभव आहे असे उमेदवारांना यामध्ये प्राधान्य देण्यात येईल
3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक(MPW) पुरुष :-
  1. बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदासाठी उमेदवार हा 12 वी मध्ये सायन्स या शाखेमधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  2. व त्याने पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स हा त्याने पूर्ण केलेला असावा
  3. यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष या कामाचा अनुभव असल्यास त्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे

एकूण पदे आणि वेतन श्रेणी

अ . क्र पदांचे नावरिक्त जागा वेतन श्रेणी
01वैद्यकीय अधिकारी671) या पदासाठी उमेदवार जर MBBS झालेला असेल तर त्याला दर महिन्याला 60,000/- रुपये एवढा पगार मिळणार.
2) उमेदवार BAMS असेल तर त्याला 25,000/- रुपये एवढा महिन्याला पगार मिळणार आणि + 15,000/- रुपये त्यांना कामावर आधारित मोबदला मिळणार.
02स्टाफ नर्स67स्टाफ नर्स साठी महिन्याला 20,000/- रुपये एवढा पगार मिळणार.
03बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष67बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदासाठी दर महिन्याला 18,000/- रुपये एवढा पगार मिळणार.
एकूण  रिक्त जागा 201

 

अर्ज कसा करायचा ?

  • या पदाच्या भरती करता अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे
  • खाली दिलेल्या अर्जाचा नमुना या लिंक वर क्लिक करा तुमच्या समोर  अर्जाचा नमुना ओपन होईल त्या अर्जाची तुम्ही प्रिंट काढून घ्या त्या प्रिंटमध्ये असलेले सर्व माहिती ही व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक भरा
  • अर्ज भरल्यानंतर तुम्हाला त्यासोबत काही डॉक्युमेंट कागदपत्रे जोडायचे आहे ती कागदपत्रे म्हणजे तुमच्या ( वयाचा पुरावा / पदवी किंवा पदवीधर असलेले प्रमाणपत्र / शेवटच्या वर्षाच्या गुणपत्रिका / गुणपत्रिका जर (CGPA)  पद्धतीचे असल्यास अर्जासोबत विद्यापीठाचे सरासरी श्रेणी पॉईंट रूपांतरण प्रमाणपत्र हे पण जोडा / रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र / शासकीय किंवा खाजगी संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभवाचा प्रमाणपत्र / तुमचा रहिवासी असल्याचा पुरावा / जातीचा दाखला / उमेदवाराचा हा वर्तमान तील पासपोर्ट आकाराचा फोटो आणि तुमची त्यावर असलेली स्वाक्षरी ) हे सर्व अर्जासोबत जोडून अर्ज व्यवस्थितपणे भरून द्या
  • अर्ज भरताना जर काही चूक झाली तर तो अर्ज बाद केला जाईल
  • अर्ज हा व्यवस्थित भरल्यावर  तुम्हाला खाली देण्यात आलेल्या पत्त्यावरती अर्ज तुम्ही पाठवून द्या
  • अर्ज भरण्या अगोदर दिलेली PDF जाहिरात एकदा काळजीपूर्वक असतात एकदा काळजीपूर्वक वाचा

Note :-

  1. उमेदवारांनी अर्ज हा सकाळी 10 ते सायंकाळी 05 वाजे पर्यंत विहित केलेल्या पत्त्यावरती समक्ष जाऊन सादर करायचा आहे
  2. अर्ज सादर करत असताना सुट्टीचे दिवस वगळूनच तुम्ही अर्ज सादर करू शकता
  3. वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज फक्त दर बुधवारी सकाळी 10 ते 05 वाजेपर्यंत या कालावधीतच स्वीकारण्यात येणार आहे

महत्वाचे मुद्दे

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – अर्ज आहे ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झाले त्या दिवशीपासून अर्ज मागविण्यात येत आहे या भरतीची जाहिरात 12 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे तेव्हापासूनच अर्ज सुरू झाले आहे
  • अर्ज संपण्याची तारीख21 जून 2024 पर्यंतच करता येणार आहे
  • नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड पुणे
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग दुसरा मजला आवक जावक कक्ष पुणे .
  • PDF जाहिरात – भरती बद्दलची PDF जाहिरात बघण्यासाठी तुम्ही    येथे क्लिक करा
  • अर्जाचा नमुना – अर्जाचा नमुना बघण्यासाठी तुम्ही                        येथे क्लिक करा

वयो मर्यादा 

या पदासाठी उमेदवाराला विशिष्ट वयोमर्यादा करून देण्यात आली आहे त्यामध्ये उमेदवाराला खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा ही 38 वर्ष असेल आणि इतर राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा ही 43 वर्षे असेल
तसेच सेवानिवृत्त उमेदवारांसाठी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी वयोमर्यादा ही 70 वर्षा पर्यंत असणार आहे आणि इतर स्टाफ नर्स बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदासाठी वयोमर्यादा ही 65 वर्षे पर्यंत असणार आहे ज्या उमेदवारांचे वय हे 65 वर्ष आहे असे उमेदवारांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र हे आर्जा सोबत जोडावे लागणार आहे

महत्वाच्या सूचना 

  • सदरची पदभरती ही पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची होणार आहे त्यामुळे अर्जदारास कायमस्वरूपी कामावर राहता येणार नाही सदर पदांची जर आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीसी शिवाय मानधनावरील सेवा बंद केली जाईल
  • सदरच्या जाहिरातीमधील पदांच्या संख्येमध्ये अथवा आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो

हे पण वाचा 

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदाच्या 180 जागांची होणार भरती

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading