BSF New Recruitment 2024: सीमा सुरक्षा दलात विविध पदांच्या 162 जागांसाठी होणार भरती, येथून करा लगेच अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group // Join Now

BSF New Recruitment 2024 : भारतीय सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती निघाली असून या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तशी या पदभरतीची जाहिरात बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे

भारतीय सीमा सुरक्षा दलात होणाऱ्या BSF New Recruitment 2024  पदभरती मध्ये जवळपास 162 जागांसाठी ही भरती होणार आहे या भरतीमध्ये मुख्यतः सब इंस्पेक्टर , हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या तीन विभागांतर्गत वेगवेगळे पदे भरण्यात येणार असून त्यानुसार ज्या पदासाठी उमेदवार हे पात्र असतील अशा उमेदवारांनी त्या पदाकरता आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा

ही BSF New Recruitment 2024 पदभरती भारतीय सीमा सुरक्षा दलांतर्गत होणार असून ही केंद्र सरकार द्वारे राबवण्यात येत आहे त्यामुळे ज्या उमेदवारांची या पद भरतीसाठी निवड होईल अशा उमेदवारांना केंद्र सरकार द्वारा काम करण्याची एक उत्तम प्रकारची संधी मिळणार आहे या BSF New Recruitment 2024 पदभरतीची असणारे ऑनलाइन फॉर्म  हे भरण्यास सुरुवात झाली असून त्याची फॉर्म भरण्याची मुदत ही 01 जुलै 2024 पर्यंत आहे त्यामुळे या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यांनी 01 जुलै 2024 च्या आताच आपला अर्ज सादर करावयाचा आहे त्यानंतर सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही

BSF New Recruitment 2024 भरतीबद्दलची असणारी माहिती 

  1. भरतीचे नाव :- भारतीय सीमा सुरक्षा दल
  2.  भरती प्रकार :- केंद्र सरकार मध्ये नोकरी मिळवण्याची संधी
  3.  श्रेणी :- भारतीय सीमा सुरक्षा दलांतर्गत केंद्र सरकार द्वारा ही भरती करण्यात येणार आहे
  4.  पदाचे नाव :- सब इंस्पेक्टर हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या तीन विभागांतर्गत पदभरती होणाऱ्या त्याची माहिती आपण खाली बघणार आहोत
  5.  एकूण पदसंख्या :- या पदभरती मध्ये जवळपास 162 जागासाठी भरती होणार आहे
  6. शैक्षणिक पात्रता : या पदाच्या भरती करता शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळ्या असणार आहे ते तुम्हाला खाली शैक्षणिक पात्रतेमध्ये बघावयास मिळणार आहे
  7.  नोकरी ठिकाण :- या पदांच्या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांना भारतामध्ये कुठेही काम करण्याची संधी मिळणार आहे
  8.  वयोमर्यादा :-  या पदाच्या भरतीमध्ये जो उमेदवार अर्ज सादर करणार आहे त्या उमेदवाराचे वय हे 20 वर्ष ते 28 वर्ष ही मर्यादा देण्यात आली आहे
  9. अधिकृत वेबसाईट :- https://www.bsf.gov.in/

BSF New Recruitment 2024

 भरतीमधील पदांची माहिती

अ.क्र.
पदाचे नाव
पद
1सब इंस्पेक्टर (Master)07
2सब इंस्पेक्टर (Engine Driver)04
3हेड कॉन्स्टेबल (Master)35
4हेड कॉन्स्टेबल (Engine Driver)57
5 कॉन्स्टेबल (Crew)46
6हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Mechanic (Diesel/Petrol Engine)03
7हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electrician02
8हेड कॉन्स्टेबल (Work Shop) AC Technician01
9हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electronics01
10हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Machinist01
11हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Carpenter03
12हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Plumber02
एकूण पदे
162

 

BSF New Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता

या पदाच्या भरती करता शैक्षणिक पात्रता आहे खालील प्रमाणे असेल

  1. सब इंस्पेक्टर (Master) :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा 12वी पास असावा आणि त्याच्याकडे 2nd क्लास मास्टर चे प्रमाणपत्र असावे .
  2.  सब इंस्पेक्टर (Engine Driver) :- या पदाकरता उमेदवार हा 12वी पास असावा व त्याच्याकडे 1st क्लास इंजिन ड्रायव्हरचे प्रमाणपत्र असावे
  3.  हेड कॉन्स्टेबल (Master) :- या पदाकरता उमेदवार हा 10वी पास असावा आणि त्याच्याकडे सेरंग प्रमाणपत्र असावे
  4.  हेड कॉन्स्टेबल (Engine Driver) :- या पदाकरता उमेदवार हा 12वी पास असावा आणि त्याच्याकडे 2nd क्लास इंजिन ड्रायव्हरचे प्रमाणपत्र असावे
  5.  कॉन्स्टेबल (Crew) :- या पदाकरता उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा आणि उमेदवाराला 265 एचपी बोट चालवण्याचा 01 वर्षाचा अनुभव असावा आणि त्याला खोल पाण्यात पोहण्याचा अनुभव असावा
  6.  हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Mechanic (Diesel/Petrol Engine) :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा 10वी पास असावा आणि त्याने ITI डिप्लोमा (मोटर मेकॅनिक डिझेल / पेट्रोल इंजिन )केलेला असावा
  7.  हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electrician :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा 10वी पास असावा उमेदवार हा ITI डिप्लोमा इन( इलेक्ट्रिशियन ) केलेला असावा.
  8.  हेड कॉन्स्टेबल (Work Shop) AC Technician :-या पदाच्या भरती करता उमेदवार हा 10वी पास असावा उमेदवाराने ITI डिप्लोमा एसी टेक्निशन मध्ये केलेला असावा
  9.  हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electronics :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा 10वी पास असावा उमेदवाराने ITI डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये केलेला असावा
  10.  हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Machinist :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा 10वी पास असावा उमेदवाराने ITI डिप्लोमा मशीन मध्ये केलेला असावा
  11.  हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Carpenter :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा 10वी पास असावा उमेदवाराने ITI डिप्लोमा कारपेंटरी मध्ये केलेला असावा
  12.  हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Plumber :- या पदाच्या भरती करता उमेदवार हा 10वी पास असावा उमेदवाराने ITI डिप्लोमा प्लंबिंग या फीडमध्ये केलेला असावा

वयो मर्यादा :- 

BSF New Recruitment 2024

  • बीएसएफ(BSF) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये उमेदवाराचे वय हे सब इंस्पेक्टर या पदासाठी कमीत कमी 22 वर्षे आणि जास्तीत जास्त 28 वर्ष पूर्ण असावे
  •  आणि कॉन्स्टेबल आणि हेडकॉन्स्टेबल या पदांच्या भरती करता उमेदवाराचे वय हे कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष पूर्ण असावे.
  • यावरील दोन्ही पदांच्या भरती करता ( SC/ST ) या उमेदवारांना वयोमर्यादित 05 वर्षाची सूट देण्यात आले आहे आणि OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट देण्यात आली आहे

वेतन श्रेणी 

BSF New Recruitment 2024

1) सब इंस्पेक्टर :- या पदासाठी ज्या उमेदवाराची निवड होईल त्या उमेदवाराला 35,400/- ते 1,12,400/-  एवढे मासिक वेतन त्याला देण्यात येईल
2) कॉन्स्टेबल :- या पदासाठीच्या उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवाराला 25,500/- ते 81,100/-  एवढे मासिक वेतन त्याला देण्यात येईल
3) हेडकॉन्स्टेबल :- या पदासाठी ज्या उमेदवाराची निवड होईल त्या उमेदवाराला 21,700/- ते 69,100/- इतके मासिक वेतन देण्यात येईल

BSF New Recruitment 2024

महत्वाच्या लिंक्स ,तारीख ,फी

अर्ज कसा सादर करावा ?

BSF New Recruitment 2024

  • या पदभरतीसाठी उमेदवाराला अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे तो कसा सादर करावा ते आपण स्टेप बाय स्टेप बघू
  • सर्वप्रथम तुम्हाला वरती दिलेल्या ऑनलाईन अर्ज या शब्दापुढे क्लिक करायचे आहे
  • तेथे क्लिक केल्यावर ती तुमच्यासमोर बीएसएफचे पेज ओपन होईल त्या पेज मध्ये तुम्ही सर्वप्रथम तुमच्या रजिस्ट्रेशन करून घ्या
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर तिथे खाली आपला ऑनलाइन या बटनावर क्लिक करायचे आहे त्यावर ती क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन फॉर्म ओपन होईल
  • त्या फॉर्ममध्ये तुमचे सर्व माहितीही व्यवस्थित रित्या आणि काळजीपूर्वक भरायचे आहे माहिती भरतानी व्यवस्थित व बरोबर असल्याची खात्री करूनच भरा
  • चुकीची माहिती जर भरली तर तो फॉर्म किंवा अर्ज बाद केला जाईल
  • तुमचे सर्व माहिती भरून झाल्यावरती नंतर तुम्हाला विहित करण्यात आलेले सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करून द्या
  • आणि त्यानंतर एप्लीकेशन फॉर्म मध्ये तुमचा फोटो आणि तुमची स्वाक्षरी हे स्कॅन करून अपलोड करा
  • एवढं झाल्यावरती तुम्हाला आकारण्यात आलेले फी ही तुम्ही ऑनलाईन स्वरूपात भरा व त्याची रिसिप्ट काढून घ्या
  • अर्ज फी भरल्यानंतर तुमचा फॉर्म हा बीएसएफ कडे सादर होईल
  • एक लक्षात असू द्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा 01 जुलै 2024 पर्यंतच करता येणार आहे त्यानंतर करण्यात आलेला अर्जाचा विचार केला जाणार नाही
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्या अगोदर तुम्हाला वरती दिलेले PDF जाहिरात ही एकदा व्यवस्थित पुणे काळजीपूर्वक वाचा
  • अशाप्रकारे तुम्हाला तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येईल

BSF New Recruitment 2024 

नवीन भरती बद्दल माहिती

 

 


Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

1 thought on “BSF New Recruitment 2024: सीमा सुरक्षा दलात विविध पदांच्या 162 जागांसाठी होणार भरती, येथून करा लगेच अर्ज”

Leave a Comment

Discover more from aaplesarkarjob.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading